हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray’s birthday celebrated with enthusiasm
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 23Jan 2021, 15:30:00
कोपरगाव : शिवसेना हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी राबवून उत्साहात साजरा झाला. नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांची या वाढदिवसांच्या कार्यक्रमांना विशेष आवर्जुन उपस्थिती होती. वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करा, असे आवाहन केल्यानंतरही समाजातील विविधस्तरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात विविध कार्यक्रमही घेतले. २३ जानेवारी हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती असल्याने यानिमित्त कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने रिक्षा स्टॅन्ड चौकात भव्य तैलचित्र उभारून फुलांची आरास करून या ठिकाणी या दोन्ही महान नेत्यांना सकाळी दहा वाजता अभिवादन करण्यात आले. तसेच अहिंसा चौकातही शिवसेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
कोपरगाव शिवसेना शहर शिवसेनेच्या वतीने नेत्र तपासणी , महिला बचत गटासाठींच्या मदतीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले, कोपरगाव तालुका ऑटोरिक्षा पतसंस्थेचे दिनदर्शिकेचे विमोचन, क्रिकेट शौकीनांसाठी भरगच्च बक्षीसे असलेली कोपरगाव तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबादेवी तरुण मंडळ व शिवसेना शाखा छत्रपती चौक आयोजित “सरसेनापती चषक” क्रिकेट स्पर्धा, कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन कार्यक्रम , गोशाळेत चारावाटप, रुग्णांना फळ वाटप आणि अन्नदानाचा कार्यक्रम नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आदी विविध कार्यक्रम आज दिवसभर राबविण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, को. ता.क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष डॉ. अजय गर्जे, महात्मा गांधी ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम चे उपाध्यक्ष किरण भोईर, मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे , महिला जिल्हाप्रमुख सपना मोरे, शिवसेना ग्राहक मंच जिल्हाध्यक्ष मुकुंद सिनगर, वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष इरफान शेख,शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल,महिला शहरप्रमुख राखी विसपुते, माजी शहरप्रमुख असलम शेख, भरत मोरे, सनी वाघ,अजिनाथ ढाकणे, सुनीलभैया तिवारी,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,भाजपा गटनेते रवींद्र पाठक, नगरसेवक संजय सातभाई, कालू आप्पा उर्फ अनिल आव्हाड, अतुल काले, नगरसेविका वर्षा शिंगाडे, भाजपा उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे शहराध्यक्ष दत्ता काले, भाजयुमोचे अविनाश पाठक राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गंगुले,नगरसेवक मंदार पहाडे, विरेन बोरावके, मेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, बबलू वाणी, विनोद राक्षे, राजेंद्र वाकचौरे, मनोज कपोते, सुनील फंड, विक्रांत झावरे, प्रफुल्ल शिंगाडे, भूषण पाटणकर, गगन हाडा, बाळासाहेब साळुंके, विकास शर्मा, कुक्कुशेठ सहानी आदींसह विशेष म्हणजे अन्य पक्षातील मान्यवरांनीही हजेरी लावली होती. सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस गुलाल व गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी कार्यकर्त्यांनी “जय भवानी” “जय शिवाजी” “हिंदुहृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो” असा जल्लोष केला. शिवसेना- युवासेना, महिला आघाडी च्या आजी-माजी पदाधिकारी,भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नगरसेवक, कार्यकर्ते, शिवसैनिकांनी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावून व फटाके फोडून जल्लोष केला.