तब्बल १० महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली; शारदा स्कूल मध्ये पहिल्या दिवशी ४० टक्के विद्यार्थ्यांची  हजेरी – प्राचार्य के. एल. वाकचौरे

तब्बल १० महिन्यानंतर शाळेची घंटा वाजली; शारदा स्कूल मध्ये पहिल्या दिवशी ४० टक्के विद्यार्थ्यांची  हजेरी – प्राचार्य के. एल. वाकचौरे

             After 10 months, the school bell rang; Attendance of 40% students on the first day in Sharda School – Principal K. L. Wakchaure

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 27Jan 2021, 19:30

कोपरगाव :  कोरोनामुळे सर्वत्र धास्तावलेली भीती त्यातच सर्वत्र लॉकडाउन डाऊन चे वातावरण अशी तब्बल दहा महिने घबराटी मध्ये वाया गेली शासनाच्या आदेशानुसार आज येथील श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल ची घंटा वाजली तब्बल १० महिन्यांनी शाळा उघडली  गेली पहिल्या दिवशी केवळ ४० टक्के उपस्थिती असल्याची माहिती प्राचार्य के एल वाकचौरे यांनी दिली .

   ते म्हणाले १० ते २ या वेळेत दररोज शाळा भरली जाणार असून कोरूना च्या पार्श्वभूमीवर शाळेच्या सर्व खोल्या आठवड्यातून दोन वेळा निर्जंतुकीकरण करून धुऊन घेतल्या जातात आज शाळेचा पहिला दिवस सर्व मुलां  मुलींचे प्रवेशद्वारावर शारीरिक तपासणी सॅनिटायजेशन करून शाळेत प्रवेश दिला जात होता मुलांची अधिक काळजी म्हणून प्रत्येक ठिकाणी  निर्जंतुकीकरण स्टॅन्ड हात धुण्यासाठी साबण आदी व्यवस्था केली होती बंद काळात ऑनलाईन प्रशिक्षण मुलांना दिले जात होते त्यात पहिली ते दहावी सहामाही परीक्षा घटक चाचणी घेण्यात आली मुलांसाठी कविता पठण हस्ताक्षर स्पर्धा कथाकथन स्वामी विवेकानंद जयंती निमित्त इंग्रजी मधून वकृत्वस्पर्धा घेण्यात आल्या त्यात २४ शाळांनी सहभाग नोंदवला होता लहान मोठ्या शिशु वर्गासाठी ऑनलाईन शिक्षणाचे व्हिडिओ पाठवले जात होते आज शाळेत हजर झालेल्या विद्यार्थ्यांना दररोज मास्क लावून येणे निर्जंतुकीकरण फवारा जवळ बाळगणे सोशल डिस्टंसिंग पाळणे तसेच स्वतःच्या जबाबदारीवर शाळेत यावे तसे शाळेला लेखी द्यावे अशा सूचना देण्यात आल्या पहिल्या दिवशी मात्र हजेरी कमीच राहिली गेली शाळेतील बऱ्याच विद्यार्थ्यांच्या फि बाकी आहेत पालकांनी शाळेच्या फिया भरून सहकार्य करावे असे आवाहन शाळा व्यवस्थापनाने केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page