कोपरगाव शहराच्या पाणी प्रश्नासाठी आमदारास भेटण्यास तयार- विवेक कोल्हे
Ready to meet MLA for water issue of Kopargaon city- Vivek Kolhe
राजेश मंटाला यांच्या डिजिटल पाणी आंदोलनाला कोल्हे परिवाराचा पाठिंबा
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 27Jan 2021, 18:30
कोपरगांव – शहराच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या बनलेल्या पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा निघावा यासाठी सर्वांनी एकजूट होऊन मोठा लढा उभारण्याची गरज आहे. हा उदात्त हेतू ठेवून आम्ही शहराच्या पाणी प्रश्नासाठी विद्यमान आमदारास भेटण्यास तयार असल्याची स्पष्ट भूमिका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी पुकारलेल्या डिजिटल पाणी आंदोलनाच्या भेटी प्रसंगी जाहीर केली. यावेळी त्यांनी कोल्हे त्यांच्या परिवाराने आंदोलनास जाहीर पाठिंबा असल्याचेही सांगितले.
शहराच्या विकासासाठी व जीवन जगण्यासाठी काही महत्त्वाच्या गरजा असतात, पाणी ही त्यातील सर्वात महत्त्वाची गरज आहे. पाणी जीवन आवश्यक आहे. कोपरगांव शहराचा पाणी प्रश्न हा कायमच गंभीर राहिला आहे त्यात पालिकेकडे पाणी साठवण क्षमता कमी असल्याने शहरातील नागरिकांना कधी ६ तर कधी ८ दिवसांनी, तर कधी कधी महिन्यातुन दोनदा पाणी मिळत असल्याने महिला भगिंनीना खुप ञास सहन करावा लागतो. दरवेळी अशीच परिस्थिती कायमच असल्याने गंभीर असलेला पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला पाहिजे. हीच भूमिका सातत्याने कोल्हे परिवाराची राहिली आहे यासाठी तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात शासनाकडे सतत पाठपुरावा करुन निळवंडे-शिर्डी-कोपरगाव बंदिस्त पाईपलाईनव्दारे पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील असतांना काहींनी राजकारण करत राजकीय खोडा घातल्यामुळे मार्गी लागत असलेला निळवंडे बंदिस्त पाईपलाईनव्दारे मिळणा-या पाण्याला अनेक अडथळे आणले निर्माण केले व ही बाब न्यायप्रविष्ट केली परंतु न्यायालयाने सर्व बाजूची तपासणी करून शहराच्या बाजुने निकाल दिल्याने शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला होता. याउपरही शहराचा पाणी प्रश्न जर सुटत असेल तर प्रसंगी आपण विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनाही भेटण्यास तयार आहोत. असेही विवेक कोल्हे यांनी सांगितले
यावेळी आंदोलनाची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला म्हणाले या डिजिटल आंदोलनाच्या माध्यमातून पंतप्रधान कार्यालयाला गेल्या तीन दिवसात कोपरगावतून ३४६४ ई-मेल पाठवण्यात आले असून जवळपास २०००० लोकांनी आपल्याला समर्थन दिले असल्याचे मंटाला यांनी म्हटले आहे.
पाणी प्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी एकजूट होण्याची गरज आहे या भावनेने शहराच्या पाणी प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी पुकारलेल्या डिजिटल पाणी आंदोलनात सहभागी असून त्यांना जाहीर पाठींबा देत आहोत व सर्व नागरिक बंधू भगिनींनीही मोठ्या संख्यने या डिजिटल आंदोलनात सहभागी होऊन अधिकाधिक मेल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यासाठी पुढाकार घ्यावा व या आंदोलनाची लिंक अधिकाधिक प्रसारित करून ’एक ई-मेल पाण्यासाठी’ या भूमिकेतून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन विवेक कोल्हे यांनी शेवटी केले.
राजेश मंटाला यांच्याभेटीप्रसंगी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले, कैलास जाधव, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विनोद राक्षे, बबलू वाणी, हरीश मंटाला, सागर जाधव, विनोद चोपडा, बापू पवार, संदीप देवकर, बाळासाहेब दीक्षित आदी.सह भाजपा, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.