समता स्कूलचा कुलदीप कोयटे : केयॉन विझकिड्स जागतिक स्पर्धेत, टॉप १० मध्ये

समता स्कूलचा कुलदीप कोयटे : केयॉन विझकिड्स जागतिक स्पर्धेत, टॉप १० मध्ये

Kuldeep Koyte of Samata School: Keyon Wizkids in World Championship, in Top 10

कोपरगावचा झेंडा समुद्रापार,  आता लक्ष अंतिम फेरी कडे

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 29Jan 2021, 19:00

कोपरगांव : समता इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी कुलदिप संदीप कोयटे याने केयॉन विझकिड्स या नामांकित जागतिक पातळीवरील स्पर्धेत अंतिम स्पर्धकांमध्ये म्हणजे टॉप १० मध्ये स्थान मिळविल्याची माहिती स्कूलच्या प्राचार्या सौ.लिसा बर्धन यांनी दिली.

या बाबत अधिक माहिती देतांना समता स्कूलचे उप प्राचार्य श्री विलास भागडे म्हणाले कि, ‘केयॉन विझकिड्स मार्फत २० वर्षांपासून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या स्पर्धांमध्ये जगभरातील लाखो विद्यार्थी सहभाग घेतात हि स्पर्धा राष्ट्रीय आंतर शालेय असून विद्यार्थ्यांना विविध स्तरावर आपले उत्कृष्ट सादरीकरण करावे लागते. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी आंतर शालेय ते राष्ट्रीयस्तरांपर्यंत मजल मारावी लागते. या लाखो स्पर्धकांमधून राष्ट्रीय स्तरावर अंतिम स्पर्धेसाठी १० स्पर्धकांची निवड केली जाते. कुलदिप ची स्पर्धा ‘व्यक्तिमत्व स्पर्धा’ (personality contest) या प्रकारात आहे. या प्रकारामध्ये शालेय शिक्षणा बरोबरच अंगभूत असणाऱ्या कला गुणांची दखल घेतली जाते. यामध्ये कुलदीप चे अभिनय कौशल्य, जतन केलेले छंद, आवड-निवड, स्वभाव, संभाषण कौशल्ये तसेच समता लिओ क्लब ऑफ कोपरगाव अध्यक्ष म्हणून राबविलेल्या सामाजिक मोहिमा,पथनाट्ये सादरीकरण, अभिनयाचे उत्कृष्ट सादरीकरण व वक्तृत्वावर असलेली पकड, संगीत कलेतील गिटार वाजविण्याची कला यांचा समावेश होतो. या स्पर्धांमध्ये व्यक्तिमत्व स्पर्धा (personality contest) या स्पर्धेचा अतिशय काठीण्यपूर्ण दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो कारण यामध्ये स्पर्धकास कमीत कमी वेळेत आपल्या अंगभूत कलांचा अविष्कार करावा लागतो. या स्पर्धेत राष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्यासाठी खूप खडतर पायऱ्या पार पाडाव्या लागतात. ज्यामध्ये सर्वसाधारण फेरी,वैयक्तिक फेरी, सादरीकरण, मुलाखत (Interview) फेरी आणि अंतिम फेरी आदि फेऱ्यामधून आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षकांसमोर कला-गुणांचे सादरीकरण करत कुलदिप कोयटे याने कोपरगाव सारख्या तालुक्याबरोबरच जिल्हा, राज्य, देशाचे नेतृत्व करून कोपरगावचा झेंडा सातासमुद्रापार फडकविला आहे. थायलंड येथे पार पडलेल्या स्कुबा ड्रायव्हिंग मधील (longest human chain under water) सहभागासाठी कुलदीप चे नाव यापूर्वीच ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदविले गेले आहे. केयॉन विझकिड्स दरवर्षी जागतिक स्तरावर स्पर्धांचे आयोजन करते. त्यामध्ये संगीत, गायन, नृत्य, वक्तृत्व, सृजनशील लिखाण, अभिनय व्यक्तिमत्व या स्पर्धांचा समावेश होतो. या यशाबद्दल सर्वच स्तरातून कुलदिप चे विशेष कौतुक होत असून समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन,महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष,समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष,ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांचा नातू, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे व विश्वस्त संदीप ओमप्रकाश कोयटे यांचा सुपुत्र आहे. समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हा.चेअरमन सौ श्वेता भरत अजमेरे,कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष  सुधीर डागा, सचिव प्रदीप साखरे, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री राजकुमार बंब, एसएसके वारड्रोबेच्या संस्थापिका सौ.सिमरन खुबाणी, समता इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापन समितीचे सदस्य, स्कूलच्या प्राचार्य सौ.लिसा बर्धन, उपप्राचार्य श्री.विलास भागडे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाकडून कौतुक केले जात असून अंतिम फेरीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page