घरपट्टी – पाणीपट्टी माफ करा, किमान करावरील शास्ती तर माफ करा -राजेश मंटाला
Home lease – Excuse the water lease, at least the penalty on the tax, then forgive – Rajesh Mantala
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 30Jan 2021, 18:30
कोपरगाव : कोविड- १९ मुळे हजारो लोकांचे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशा आर्थिक संकटात शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी घरपट्टी पाणीपट्टी माफ करा , ती जर माफ करता येत नसेल तर किमान थकीत करावरील शास्ती माफ करावी, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे प्रत्यक्ष भेट घेऊन मांडली आहे.
करावरील शास्ती माफ करावी, अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते म्हंटला यांनी गुरुवारी (२८) रोजी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातील निवेदन दिले. शुक्रवारी (२९) रोजी हेच निवेदन कोपरगाव येथे नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांची भेट घेऊन त्यांना दिले. यापूर्वी १३ जानेवारीला राजेश मंटाला यांनी याच निवेदनाची प्रत तालुक्याचे आमदार आशुतोष काळे तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, यासंबंधीतांना ई-मेल व्दारे कळविले आहे. विशेष म्हणजे या निवेदनाची दखल घेऊन माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत नगर विकास २ या विभागाकडे पुढील कारवाईसाठी पाठविले असल्याची माहिती मंटाला यांनी दिली आहे. मालमत्ता कर व पाणी बिलात सवलत देण्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार नपा प्रशासनाला नाही.भरीस भर नेहमीप्रमाणे नपाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. मालमत्ता कर व पाणी बिल यातून अपेक्षित वसुली नाही. अशा परिस्थितीत आस्थापना खर्च भागवताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. करात सवलत किंवा शास्ती कर माफ करण्याबाबत सर्वसाधारण सभेमध्ये ठराव करून तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवावा लागेल. सरकारने मंजुरी दिली तरच करात सवलत मिळेल. तेंव्हा आता शास्ती माफ करण्याचा अधिकार असलेले , शास्ती माफ करून दिलासा देणार का? अशी उत्सुकता थकबाकीदारांना लागली आहे.