सत्ताधारी आमदार होण्याच्या संधीचे सोने करू :- आ. आशुतोष काळे
Let’s seize the opportunity to become a ruling MLA: – Ashutosh Kale
१ कोटी ६० लाख कामाचे भूमिपूजन
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 31Jan 2021, 18:20
कोपरगाव : माजी आमदार अशोकराव काळे दहा वर्ष विरोधी पक्षाचे आमदार असतांना देखील अडथळ्यांची शर्यत पार करून त्यांनी कोपरगाव विधान मतदार संघाचा भरीव विकास करून दाखविला. मात्र जे नेहमीच सत्तेत राहिले त्यांना सत्ताधारी असून देखील मिळालेल्या संधीचे सोनं करता आले नाही. मी मात्र सत्ताधारी आमदार होण्याच्या मिळालेल्या संधीचे सोने करून दाखविणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमप्रसंगी दिली .
मुख्य लेखाशीर्ष २५१५ ग्रामविकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर ७५ लक्ष निधीतून कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथे रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन तसेच सांगवीभुसार येथे ७५ लक्ष निधीतून रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन व धामोरी येथे १० लक्ष निधीतून संत सावता महाराज मंदिरास संरक्षक भिंत बांधणे अशा एकूण १ कोटी ६० लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाले. आ. काळे म्हणाले की, मतदार संघातील रस्त्यांचा अनुशेष खूप मोठा आहे. अनेक रस्ते नकाशावरच नाहीत. हे रस्ते नकाशावर आणण्यासाठी २०२१ पासून सुरु होणाऱ्या योजनेसाठी ८३५ किलोमीटरचे ४३६ रस्ते जिल्हा परिषदेकडेकडून सरकारकडे मंजुरीसाठी पाठविले जाणार आहे. या रस्त्यांना मंजुरी मिळविण्यासाठी सरकारकडे सर्वोतोपरी प्रयत्न करून या रस्त्यांसाठी निधी आणू. मागील पाच वर्षात विजेचा देखील गंभीर प्रश्न निर्माण करून ठेवला गेला आहे. दीड कोटी रुपये निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. प्रत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. निवडणुकीत जय-पराजय होत असतो. पराभवाचा अनुभव मी देखील घेतला आहे त्यामुळे झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीतील पराभवाने खचून जाऊ नका. यामध्ये शिकून पुढे चला, या निवडणुकीचा अनुभव घेवून पुढील तयारी करण्यासाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागा असा मौलिक सल्ला देवून कार्यकर्त्यांना आ. आशुतोष काळे यांनी प्रोत्साहित करून कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमा जगधने, अर्जुन काळे, सुधाकर दंडवते, सुधाकर रोहोम, संचालक ज्ञानदेव मांजरे, अशोक काळे, माजी संचालक बाळासाहेब कदम, नारायण मांजरे, चंद्रशेखर कुलकर्णी, राजेंद्रबापु जाधव, अनिल कदम, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, भगवान माळी, पुंडलिक माळी, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, उपअभियंता उत्तम पवार, आदींसह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. चौकट :- चाऱ्या उकरण्याचे काम हाती घेतले त्याबद्दल शेतकऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचे यावेळी आभार मानले.