कोपरगावात बुधवारी जैन संत उपाध्याय प.पू. प्रवीणऋषीजी यांचे आगमन

कोपरगावात बुधवारी जैन संत उपाध्याय प.पू. प्रवीणऋषीजी यांचे आगमन

In Kopargaon on Wednesday, Jain saint Upadhyay P.P. Arrival of Praveen Rishiji

 

“णमो सिद्धाणं,णमो आयरियाणं,
णमो उवज्झायणं,णमो लोएहव्वसाहूणं “

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 1Feb 2021, 11:30

कोपरगाव : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराजांचे शिष्य, श्रमण संघीय उपाध्याय, परमपूज्य प्रवीण ऋषी जी महाराज सा. व, मधुर गायक श्री तीर्थेश ऋषि जी महाराज सा. यांचे बुधवारी (३) रोजी सकाळी ८ वाजता कोपरगाव शहरामध्ये मंगल आगमन होणार असल्याची माहिती श्रमण संघाचे अध्यक्ष प्रेमराज भंडारी यांनी दिली.

याबाबत संघाच्यावतीने पत्रकात म्हटले आहे की, परमपूज्य प्रवीणऋषीजी  व परमपूज्य तीर्थेशऋषीजी महाराज यांचे सकाळी ८ वाजता लहान पुलावर मंगल आगमन होणार आहे त्यांच्या स्वागतासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान जैन श्रमण संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवारी (३) रोजी सकाळी ८ वाजता कोपरगाव येथील गोदावरी नदी लहान पुलावर परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज यांचे आगमन होणार असून परमपूज्य प्रवीणऋषीजी महाराज हे बुधवार (३) व गुरुवार (४) हे दोन दिवस कोपरगाव येथील जैन स्थानकात वास्तव्यास राहणार असून या कालावधीत बुधवारी सकाळी ९ ते १० प्रवचन दुपारी २.३० ते ३.३० महिला साठी धार्मिक चर्चा व रात्री ८ ते ९ जाहीर प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती जैन समाज संघाचे सदस्य सुनील बंब यांनी दिली आहे.
या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जैन श्रमण संघ, मंजुश्री महिला मंडळ, आनंद नवयुवक मंडळ, भारतीय जैन संघटना यांनी केले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page