निफाड प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांचा माहेगाव देशमुख येथे सत्कार.
Niphad Province Officer Dr. Archana Pathare felicitated at Mahegaon Deshmukh.
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3Feb 2021, 19:00
कोपरगाव: निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांना नुकताच राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
प्रशासनातील बारकावे आणि जनतेची सेवा याचा अभ्यास करून डॉ. अर्चना पठारे यांनी अल्पावधीत राज्यस्तरीय झेप घेतली असल्याचे बाळासाहेब पानगव्हाणे म्हणाले. डॉ. पठारे यांचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, संचालक सोपानराव पानगव्हाणे, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष एल. डी. पानगव्हाणे, पी आर काळे, सोनाली पानगव्हाणे आदींनी अभिनंदन केले. डॉ. अर्चना पठारे या कोल्हे कारखान्याचे कर्मचारी विलास पानगव्हाणे यांच्या भाची आहेत.