सोमैया कॉलेजात भूगोल दिन साजरा

सोमैया कॉलेजात भूगोल दिन साजरा

Celebrate Geography Day at Somaiya College

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3Feb 2021, 18:30

कोपरगाव :के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय, कोपरगाव येथे भूगोल विभाग व संशोधन केंद्रातर्फे भूगोल दिन साजरा करण्यात आला. भूगोल दिन हा दरवर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.या दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेतले जातात. मात्र या वर्षीच्या covid-19 परिस्थितीमुळे भूगोल दिनाचा कार्यक्रम हा ऑनलाइन पद्धतीने साजरा केला गेला.या कार्यक्रमाअंतर्गत एस. बी पी. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सोलापूर येथील भूगोल विभाग प्रमुख डॉ. दीपक देडे यांचे विशेष मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केले गेले. दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ४.०० वाजता या व्याख्यानाचे आयोजन केले गेले. या कार्यक्रमास विभागातील ६८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.             डॉ. दीपक देडे यांनी याप्रसंगी भूगोल, भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ या विषयावर व्याख्यान देताना त्यांनी भूगोलातील महान व्यक्ती अलेक्झांडर हम्बोल्ट, कार्ल हिटर यांच्या विचारांनापासून सुरुवात करून अलीकडच्या काळातील भौगोलिक माहिती प्रणाली, उपग्रह प्रतिमा व भूगोल या विषयांमध्ये ज्या ज्या घडामोडी झाल्या त्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली .

  या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी महाविद्यालयाची मागील काही वर्षापासून केलेल्या दैदिप्यमान कामगिरीची माहिती व भविष्यामध्ये के. जे. सोमैया महाविद्यालय कसे असेल याचीही माहिती देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

  भूगोल विभाग व संशोधन केंद्र प्रमुख डॉ. जी. के. चव्हाण यांनी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दीपक देडे सर यांची ओळख करून दिली. तसेच महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विविध विद्यार्थीप्रिय व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. विभागातील नव्याने सुरु करण्यात संशोधन केंद्रामध्ये पाच संशोधन प्राध्यापक कार्यरत असून पहिल्या फेरीमध्ये सात विद्यार्थी विविध भौगोलिक समस्यांवर संशोधन करत आहेत.महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांनी याप्रसंगी महाविद्यालयात होणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूगोल विभागातील प्रा. डॉ. लीना त्रिभुवन यांनी केले तर प्रा. डॉ. साळुंके यांनी मान्यवरांचे आभार मानले. तसेच विभागातील प्रा. आकाश सोनवणे व प्रा. कुणाल शिंदे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page