कोपरगावात चेतन वैदय यांचा भाजपच्यावतीने सत्कार
BJP felicitates Chetan Vaidya in Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3Feb 2021, 20:00
कोपरगाव : सिरम इन्स्टिटयुटचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन वैदय यांचा भाजपच्यावतीनेसौ. स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला . कोरोना वरील लसीकरणात महत्वाचे योगदान दिलेल्या सिरम इन्स्टिटयुटचे मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन वैदय यांनी नुकतीच कोपरगावला भेट दिली.
मुळचे कोपरगावचे रहिवाशी असलेले चेतन वैदय सध्या पुणे येथे सिरम इन्स्टिटयुट या कपंनीत कार्यरत आहे. तालुक्यातील चासनळी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले, महाविदयालीन शिक्षण सदगुरू गंगागीर महाराज काॅलेज येथे तर वैदय यांनी संजीवनी अभियांत्रिकी महाविदयालयात फार्मसी ची पदवी घेतली. कोरोना या आजाराने जगभर प्रादुर्भाव घातला, गेले अनेक दिवसापासून यावर लस शोधण्याचे काम सुरू होते, पुणे येथील सिरम कंपनीने या लसीची निर्मिती केली आहे. या महत्वपुर्ण कार्यात योगदान असलेल्या श्री वैदय यांचा माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यालयात अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, शहराध्यक्ष दत्ता काले, महावीर दगडे, बाळासाहेब आढाव, विवेक सोनवणे, सोमनाथ म्हस्के, सोमनाथ आहिरे, प्रमोद नरोडे, दादा नाईकवाडे, दौलत लटके, खालीक कुरेशी, नाना गवळी, किरण सुपेकर, जगदिश मोरे, मुकुंद काळे, शंकर बि-हाडे, गोरख देवडे, फकीर महमंद पहिलवान, शक्ती परदेशी, श्याम आहेर, रोहन दरपेल, सुजल चंदनशिव, चंदन बागले, अमोल मोरे, विनोद पवार आदी उपस्थित होते.