देवयानी ट्रकच्या धडकेने कोपरगाव शहराच्या मुख्य जलवाहिनी व्हॉलचे नुकसान
Damage to the main waterway wall of Kopargaon
कोपरगाव : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या व्हॉलला ट्रकची धडक बसल्याने व्हॉलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाईपलाईन दुरुस्ती नंतरच शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती नगर पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कोपरगाव शहरातील नगर मनमाड महामार्गावरील टिळेकर वस्ती साईधाम कमानी समोर गुरुवारी (४) फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सातारा येथून मालेगावच्या दिशेने गूळ घेऊन जाणाऱ्या देवयानी नावाच्या माल ट्रक क्रमांक एम. एच. १८ बी. जी. ०२७७ याने नगरपालिकेच्या कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिणीच्या व्हॉलला जोराची धडक दिल्याने या जलवाहिणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या जलवाहिणीचे काम करण्यासाठी कोपरगाव नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले, हे काम लवकरात लवकर कसे होईल अन शहराचा पाणी पुरवठा पूर्ववत कसा होईल यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी प्रयत्नरत असून कर्मचाऱ्यांकडून पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी मोठ्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी ऋतुजा पाटील यांनी दिली आहे





