कोपरगाव नगरपालिकेचे सभापती भाजप-सेनेचेच, निवडी बिनविरोध

कोपरगाव नगरपालिकेचे सभापती भाजप-सेनेचेच, निवडी बिनविरोध

सभापती निवडीनंतर नवनियुक्त सभापती व भाजप-शिवसेना नगरसेवक- नगरसेविका

BJP-Sena chairman of Kopargaon municipality, unopposed

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 4Feb 2021, 18:00

 कोपरगाव : येथील नगर पालिकेमध्ये गुरूवारी (४) रोजी झालेल्या विषय समिती निवडीत भाजपा -शिवसेना यांचे बहुमत असल्याने सभापतींच्या निवडी मात्र बिनविरोध झाल्या आहेत. पालिकेच्या सभागृहामध्ये विवीध विषय समित्यांच्या निवडीसाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी काम पाहिले व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे उपस्थित होते.

कोपरगाव नगरपालिका सभापती निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांची सत्ता होती. या युतीच्या सत्तेत शिवसेनेला सामावून घेण्यात आलंय. कोपरगाव नगरपालिका बांधकाम सभापतीपदी भाजपचे संजय कारभारी पवार यांची निवड झालीय. पाणीपुरवठा सभापती पदावर सौ. सुवर्णा विवेक सोनवणे यांची निवड झालीय. याशिवाय शिक्षण मंडळ सभापती शिवसेनेचे योगेश तुळशीदास बागुल यांची, तर महिला बालकल्याण सभापती पदावर भाजपच्या हर्षा दिनेश कांबळे यांची निवड झाली. तसेच स्वच्छता वैद्यकीय व आरोग्य सभापती पदावर भाजपाचे शिवाजी आनंदा खांडेकर यांची निवड करण्यात आली, नियोजन व विकास समिती पदावर उपनगराध्यक्ष स्वप्नील शिवाजी निखाडे यांची निवड करण्यात आली. स्थायी समिती सभापती नगराध्यक्ष विजय सूर्यभान वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील शिवाजी निखाडे, संजय कारभारी पवार, योगेश तुळशीदास बागुल, शिवाजी आनंदा खांडेकर, सुवर्णा विवेक सोनवणे, हर्षा दिनेश कांबळे, रविंद्र नामदेव पाठक, ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई, मंदार सुभाष पहाडे यांचा समावेश आहे. कोपरगाव नगरपालिकेमध्ये संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सभापतींची निवड केली. निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे , मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपमुख्याधिकारी सुनील गोरडे यांनी सभापती तर सभा अधिक्षक म्हणून ज्ञानेश्वर चाकणे यांनी निवड प्रक्रिया पार पाडली. यावेळी कोपरगाव नगराध्यक्ष विजय वहाडणे , उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे आणि सर्वच नगरसेवक-नगरसेविका उपस्थित होत्या. कोपरगाव नगरपालिकेतील वेगवेगळ्या विभागाच्या सभापतीपदी आपल्या नेत्याची निवड झाल्यानंतर संबंधितांच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. सकाळी १० ते १ विषय समिती आणि स्थायी समिती सदस्यांचे नामनिर्देशन करणे, दुपारी १ ते ३ विषय समिती सभापतीसाठी मुख्याधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर करणे, दुपारी ३ ते ३.३० यावेळेत नामनिर्देशन पत्रांची छाननी, दुपारी ३.३० वाजता निवडी जाहीर करण्यात आल्या. नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांची सत्ता होती. त्यामध्ये आता काही बदल झाले आहेत. कोपरगाव नगरपालिकेच्या स्थायी समिती आणि विषय समित्यांचा कार्यकाल २८ जानेवारी २०२१ रोजी संपला. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी निवडीसाठी आज (४ जानेवारी) सकाळी १० वाजता प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page