कर्मवीर शंकरराव काळेंचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे – सौ.चैताली काळे
The work of Karmaveer Shankarrao Kale is like a beacon – Mrs. Chaitali Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 4Feb 2021, 18:30
कोपरगाव : अंधाराच्या पलीकडे आशेची किरण असणार या विश्वासातून शैक्षणिक , सहकार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या दैदिप्यमान कामगिरीमुळे कर्मवीर शंकरराव काळे यांचे कार्य दीपस्तंभाप्रमाणे असल्याचे गौरवोद्गार जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ.चैताली काळे यांनी सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयात कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित ऑनलाईन स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले .
सौ. चैताली काळे म्हणाल्या की, क्विक आणि फास्ट हि आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून जीवनात येणाऱ्या संघर्षाला स्विकारून मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यावा असा सल्ला दिला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक स्वामीराज भिसे प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलतांना स्वामीराज भिसे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात आपली कौशल्ये जोपासावीत व आपल्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करून स्वत:चे करिअर घडवावे. पुस्तकांचे वाचन करून सभोवतालची माणसे व परिसर वाचायला शिकले पाहिजे असे सांगितले. स्पर्धा परीक्षक डॉ.कैलास महाले यांनी यावेळी कर्मवीर शंकरराव काळे कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी प्रा. विठ्ठल लंगोटे, उपस्थित होते. यावेळी आय.एस.ओ.लीड ऑडिटर अनिल येवले यांनी सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाचे आय.एस.ओ. मानांकन प्रमाणपत्र सौ. चैताली काळे यांना प्रदान केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक स्वागत प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. चांगदेव खरात व प्रा.उमाकांत कदम यांनी केले तर आभार डॉ. सौ.निर्मला कुलकर्णी यांनी मानले.