अखिल गुरव समाज संघटनेचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत बंदावणे

अखिल गुरव समाज संघटनेचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष वसंत बंदावणे

Vasant Bandawane, the new National President of Akhil Gurav Samaj Sanghatana

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 7 Feb 2021, 8:30

कोपरगाव : अखिल गुरव समाज संघटना ही ऍड.अण्णासाहेब शिंदे यांनी१३ वर्षांपूर्वी स्थापन करून महाराष्ट्र, गुजराथ, कर्नाटक मध्यप्रदेश या राज्यातील गुरव समाज एका झेंड्याखाली आणला.गुरव जोडो अभियान राबवून पोटजातीत बेटीव्यवहार सुरू केला.गेली तेरा वर्षे त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले व आता ही जबाबदारी समन्वय समितीने वसंत बंदावणे यांचेवर सोपवली आहे.

बंदावणे हे सुरुवातीपासून संघटनेत कार्यरत आहेत. गुरव समाज संघटित करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात अनेक दौरे केले आहेत.समाजाची जडण घडण व इतिहास या विषयातील त्यांचा अभ्यास आहे. मनमिळावू व धाडसी स्वभाव असल्याने ते अण्णांच्या मार्गदर्शनाखाली समाजाला न्याय मिळवून देतील.अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान असल्याने व संगमनेर तालुक्याला हा सन्मान मिळाल्याने महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे , संस्थापक ऍड. अण्णा शिंदे यांनी बंदावणे यांचे अभिनंदन केले आहे. ‘ महाराष्ट्रात पंचवीस लाखाच्या आसपास गुरव समाज असल्याने त्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहील.’ असे बंदावणे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page