कोपरगाव शिवसेनेच्या वतीने इंधन दरवाढ विरोधात आंदोलन
Kopargaon Shiv Sena agitates against fuel price hike
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 6 Feb 2021, 15:30
कोपरगाव : दिवसेंदिवस पेट्रोल- डिझेल आणि गॅसदरवाढीने महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य जनता अक्षरशः होरपळून निघत असतानाही,हि दरवाढ कमी करण्या -ऐवजी उलट वाढतच आहे. त्यामुळे अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकार विरोधात कोपरगाव शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने त्वरित पेट्रोल डिझेल व गॅसचे दर कमी करावे अन्यथा मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडण्यात येईल व याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकारची राहील असे निवेदन शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. शिवसेना नगर उत्तर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी मोदी सरकारचा कडाडुन विरोध करत, निषेध करण्यात आला. यावेळी पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती त्वरित कमी करा अशा मागण्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, विधानसभा संघटक असलम शेख,एस.टी कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे,ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, संजय गुरसळ, बाळासाहेब जाधव, वाहतूकसेना जिल्हाप्रमुख इरफान शेख, कुक्कूशेठ सहानी, विक्रांत झावरे, विकास शर्मा, प्रफुल्ल शिंगाडे, गगन हाडा, गोपाळ वैरागळ, आकाश कानडे, बाळासाहेब साळुंके,रफिक शेख,मयूर दळवी, योगेश मोरे, दत्तात्रय झावरे, अंबादास वाघ, विशाल झावरे, विजय सोनवणे, सचिन आसने, अक्षय नन्नवरे, अशोक कानडे, पप्पू पेकळे, अविनाश धोक्रट, जाफर सय्यद, राकेश वाघ, प्रवीण शेलार, किरण अडांगळे, पिनू सावतडकर, वैभव हलवाई,श्रीपाद भसाळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे,नगरसेविका वर्षा शिंगाडे, सारिका कुहिरे, शहरप्रमुख राखी विसपुते, अश्विनी होने, शितल चव्हाण,अक्षता आमले, राहुल देशपांडे, सतीष शिंगाणे,चंद्रहंस पाबळे, सतीश लोळगे आदी शिवसैनिक उपस्थित होते.