माहेगावच्या चारही दिशांना मा. आ. सौ. कोल्हेच्यांच निधीची कामे दिसतात – एलडी. पानगव्हाणे
In all four directions of Mahegaon, Former MLA Kolha’s fund works – LD. पानगव्हाणे
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 7 Feb 2021, 15:30
कोपरगाव : कोपरगावच्या तात्कालिन पहिल्या महिला आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्याकडे विद्यमान सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे यांनीसातत्याने पाठपुरावा करून गावासाठी निधी मिळविला. त्या निधीतील असंख्य कामे आज पुर्णत्वाकडे आलेले असुन माहेगाव देशमुखच्या चारही दिशांना माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्याच निधीची कामे दिसत असल्याचे वक्तव्य संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष एलडी. पानगव्हाणे यांनी एका जाहीर कार्यक्रमात केले.
एलडी. पानगव्हाणे पुढे म्हणाले, लोकनियुक्त सरपंच पानगव्हाणे यांना जनतेने या खुर्चीवर बसवले, तेंव्हा पासून त्यांनी गावाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. तात्कालिन आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून गावासाठी निधी मिळविला. ही वस्तुस्थिती असुन ख-या अर्थाने सरपंच पानगव्हाणे यांच्या कार्यकाळातच गावचा चेहरा मोहरा बदलला असल्याचेही ते म्हणाले. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यामध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत, वीज बिलाच्या प्रश्नावर जनता मेटाकुटीस आलेली आहे. कोरोनामुळे झालेल्या लाॅकडाउनमध्ये अनेकांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागले. त्यामुळे मोठया आर्थीक समस्येला जनता सामोरे जात असतांना राज्य सरकारने सक्तीची वीज वसुली सुरू केली आहे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली. तालुकाभर ही परिस्थिती असतांना माहेगाव देशमुखमध्येही गोरगरीबांचे वीज कनेक्शन तोडली जात आहे. झोपलेल्याला जागे करणे जमते, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेले आहे, त्यांना जागे कसे करणार, हीच अवस्था विद्यमान लोकप्रतिनिधींची झाली आहे. त्यांना गावच्या विकासाशीही काही देणेघेणे नाही, अशी जोरदार टीका एलडी. पानगव्हाणे यांनी शेवटी केली आहे.