मोठी बातमी ! ६ फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा; पोलिस, महसूलच्या व नगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश – डॉ. कृष्णा फुलसौंदर

मोठी बातमी ! ६ फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा; पोलिस, महसूलच्या व नगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश – डॉ. कृष्णा फुलसौंदर

Big news! Second phase of vaccination from February 6; Including police, revenue and municipal employees – Dr. Krishna Fulsaunder

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 7 Feb 2021, 16:00

कोपरगावात : पहिल्या टप्प्यात लसीकरणासाठी १००० लस डोस उपलब्ध झाली होती , पैकी ८६९ जणांना लस टोचण्याचे आली होती तर आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी ८०० लस डोस उपलब्ध झाले असून . शनिवारी ६ फेब्रुवारीपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु करण्यात आला आहे. यात पोलिस, महसूल व नगरपालिका या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयाचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

दुसऱ्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांच्या देखरेखीखाली लस टोचून घेताना तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव शहर पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व नायब तहसीलदार दिसत आहेत.

डॉ कृष्णा फुलसौंदर माहिती देताना पुढे म्हणाले, दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरणाचे मानकरी तहसीलदार योगेश चंद्रे ठरले असून यावेळी शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, नायब तहसीलदार लस टोचण्यात आली. यावेळी यासह वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात
कोरोना लसीकरण शुभारंभ सोमवारी २५ जानेवारीला करण्यात आला होता . या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, सरकारी डॉक्टर, आशा सेविका, नर्स, खाजगी डॉक्टर व त्यांचे कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले, तर पहिल्या लसीकरणाच्या मानकरी डॉ. वैशाली बडदे या ठरल्या होत्या. 

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सूचना…
पोलिस, महसूल व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी या फ्रंटलाईवरील प्रत्येक कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार आहे.
आठवड्यातील पाच दिवस सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार व शनिवारी लसीकरण केंद्रांतून आता प्रत्येकी शंभर जणांना टोचली जाणार आहे.

कोरोनावरील प्रतिबंधित लस तयार झाल्यानंतर कोव्हि-शिल्ड या प्रकारची लस आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचली जात आहे. लसीकरणासाठी सर्वच वयोगटातील कर्मचारी अधिकारी यांनी चांगले सहकार्य केले असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले तर आता पोलीस महसूल व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी या फ्रंट लाईनवरील कर्मचाऱ्यांना लस टोचली जाणार असून या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती अपलोड करण्याचे आदेश सार्वजनिक आरोग्य विभागाने संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.माहिती अपलोडिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु केला जाणार आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page