जिल्हा बँक निवडणुकीत आमदार काळे यांचा “लता कुंज” बंगला, व काळे पॅटर्न दोघांचीही जोरदार चर्चा

जिल्हा बँक निवडणुकीत आमदार काळे यांचा “लता कुंज” बंगला, व काळे पॅटर्न दोघांचीही जोरदार चर्चा

In the district bank election, MLA Kale’s “Lata Kunj” bungalow and Kale pattern are both hotly debated

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13Feb 2021, 19:00

 कोपरगाव : जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या. २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या, दिग्गजांनी आपापले गड शाबूत ठेवले, या दरम्यान ज्या काही घडामोडी झाल्या त्याची मुख्य सूत्रे आमदार आशुतोष काळे यांच्या “लता कुंज” या बंगल्यावरून हालविल्या जात होती. तर माघारी पर्यंत ची वाट न पाहता प्रचारात आघाडी घेणाऱ्या आशुतोष काळे पॅटर्नची जिल्ह्यात मात्र जोरदार चर्चा सुरू आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी ८३२ मतदारसंख्या असलेल्या शेतीपूरक मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासह जिल्हाभरातून एकूण ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात झाले होते. माघारीनंतर म्हणजे ११ फेब्रुवारीला निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार होते, मात्र कुणी अर्ज माघारी घेवू अथवा घेवू नये याचा विचार बाजूला ठेवून निवडणूक जिंकायचीच या उद्देशाने अर्ज माघारीच्या दोन दिवस अगोदरच म्हणजे ९ तारखेलाच आमदार आशुतोष काळे यांनी जिल्हाभरातील कार्यकर्त्यांना सूचना देवून रणनीती आखून काळे पॅटर्न राबवून निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते या यंत्रणेने प्रचारात आघाडी घेऊन माघारी पर्यंत प्रचाराची एक फेरी पूर्ण केली होती. त्यामुळे निवडणूक जरी जिल्हा बँकेची असली तरी जिल्हाभर चर्चा मात्र आमदार आशुतोष काळेंच्या निवडणूक पॅटर्नची दिसून येत आहे. तिकडे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या “लता कुंज” बंगल्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे बसून सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन होते.येथील बैठकांमध्ये चर्चेचे गुऱ्हाळ रंगले, काही उलाढाली झाल्या, खलबते झाली, अंतिम क्षणापर्यंत बैठकाच्या ठिकाणावरून अर्ज माघारीसह अर्ज ठेवण्याचे सूत्र हालविले जात होते. एकंदरीत जिल्हा बँकेचे या निवडणुकीत एकीकडे आमदार आशुतोष काळे यांचा “लता कुंज” हा बंगला तर निवडणूक प्रचारात आघाडी घेतलेला या काळे पॅटर्न हे दोन्ही विषय चर्चेचे ठरले आहेत. १७ जागा बिनविरोध झाल्याने आता चार जागांसाठी आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आजही काळे यांच्या “लता कुंज” बंगल्यावर घडणाऱ्या घडामोडी कडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page