पोहेगाव ग्रामसभेत पंचवीस वर्षांनंतर पुन्हा एकदा दारूबंदी ठरावाची पुनरावृत्ती
Pohegaon Gram Sabha repeats the Alcohol ban once again after 25 years
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13Feb 2021, 18:30
कोपरगाव : पोहेगाव चे तत्कालीन सरपंच शिवसेनेचे नितीन औताडे यांनी पंचवीस वर्षापूर्वी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव केला होता, आज पंचवीस वर्षांनंतर त्याच दारूबंदी ठरावाची ग्रामसभेत पुनरावृत्ती करण्यात आली.
शिवसेनेचे नितीन औताडे यांनी सातत्याने अवैध दारूधंदे याविरुद्ध संघर्ष केला. शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदने दिली याचा राग येऊन काही अवैध दारू विक्रेत्यांनी नितीन औताडे यांच्या कुटुंबाला टारगेट केले होते.
ग्रामसभेत विद्यमान सरपंच अमोल औताडे यांनी कोणाला कितीही राजकारण करू द्या, मात्र जोपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये आमची सत्ता आहे तोपर्यंत आम्ही अवैध धंद्यांना पाठबळ देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली. यावेळी शिवसेनेचे नितीन औताडे, कोल्हे कारखान्याचे संचालक अशोक औताडे, सरपंच अमोल औताडे उपसरपंच प्रशांत रोहमारे, प्रकाश रोहमारे, सचिन शिंदे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, स्थैर्यनिधी चे संचालक रमेश झांबरे, चंद्रकांत औताडे, तात्यासाहेब झांबरे, राजेंद्र औताडे, निखील औताडे, निवृत्ती औताडे, अशोकराव नवले, सचिन शिंदे, प्रकाश औताडे , प्रकाश रोहमारे, विनायक मुजगुले, कैलास औताडे, रविंद्र भालेराव, नितीन नवले, बाळासाहेब रोहमारे, अजित औताडे, निकिता चौधरी, पुष्पा काकडे, सुनंदा औताडे, रुपाली वाघ, वर्षा निकम, सुनंदा साळुंके, मनिषा ब्राम्हणे, वैशाली सोनवणे, अनिता गांगुर्डे आदींसह महिला ग्रामस्थ व व्यापारी वर्ग उपस्थित होते.प्रास्ताविक ग्रामसेवक रामदास काळे यांनी केले. नितीन औताडे म्हणाले, अवैध धंद्यांना थारा दिला नाही म्हणूनच पोहेगाव चा विकास पाहावयास मिळतो. मात्र दुर्दैवाने काही लोक केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी काही लोक अवैद्य धंदे करणा-यांना पाठीशी घालत आहेत.आमचा कोणा एका व्यक्ती सोबत वाद नाही मात्र अवैध धंदे करणारी कोणतीही व्यक्ती असो त्याला मात्र आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ. अवैध या विरुद्ध प्रशासनाला जाग करण्यासाठी प्रसंगी आंदोलनाला सामोरे जाऊ मात्र यावेळी जर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासनच जबाबदार राहील असा असेही त्यांनी यावेळी सांगितले. दारू विक्री लवकरात लवकर बंद होण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले. व्यापारी व छोट्या उद्योजकांचे नुसकान होऊ नये म्हणून सकाळी ११ वाजता ग्रामसभा संपल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत करण्यात आले.





