आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Atrocities on tribal minor girls
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 13Feb 2021, 20:00
कोपरगांव : तालुक्यातील डाऊच बु.येथील १७ वर्षीय आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले मे २०१९ मध्ये तिच्याशी लग्न केले, व शारीरीक संबंध ठेवून ती आठ महिन्याची गरोदर राहिल्या प्रकरणी कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात आरोपी नवनाथ श्रावण शाख याचेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या सबंधी पो.कॉ. प्रकाश बबन कुंढारे यांनी आरोपी नवनाथ श्रावण शाख वय २३ रा.डाऊच बु. विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, सन २०१८- १९ आज पावेतो, न्यु इंग्लिश स्कुल चांदेकसारे ते लोणी आहेर वस्ती दरम्यान आरोपीने आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले तिचेशी बळजबरीने २३ मे २०१९ रोजी लग्न करुन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवल्याने ती आठ महिन्याची गरोदर राहिली तिचेवर जिल्हा सामान्य रुग्णालय नासिक येथे उपचार चालू आहे. या प्रकरणी पोलीस निरिक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई.भरत नागरे पुढील तपास करीत आहे. आरोपी विरुद्ध भा. द. वि. कलम ३६३,३७६ ,आय व पोक्सोखाली गुन्हा दाखल झाला आहे.