वीज न तोडता थकीत बिलाचे हफ्ते करून द्या- आ. काळेंच्या महावितरणला सूचना
Make the bill for weeks without breaking the electricity. Notice to Kale’s MSEDCL
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 14Feb 2021, 20:00
कोपरगाव : महावितरण शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून महावितरण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामंजस्यपणाची भूमिका घेऊन वीज न तोडता थकीत बिलाचे हफ्ते करून द्या, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना केल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांकडून शेतीपंपाच्या वीज बिल वसुली करतांना महावितरण कडून वीज रोहित्र बंद करण्यात येत आहे. या धोरणाबाबत आमदार काळे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची भेट घेतली. शेतकरी अडचणीत आहे त्यात गहू, कांदे, मका, आदी पिकांना पाण्याची अत्यंत गरज असून वीज रोहित्र बंद करून वीज पुरवठा खंडित केल्यास शेतकऱ्यांचे उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होवून शेतकरी अडचणीत सापडणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या निदर्शनास आणून दिले. महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात असली तरी महावितरणने शेतकऱ्यांना विश्वासात घेवून त्यांना योजना समजावून सांगावी. थकीत वीजबिल भरण्यासाठी समुपदेशन करून शेतकऱ्यांची मानसिकता तयार करावी शेतकऱ्यांना थोडासा अवधी द्यावा. थकीत रक्कमेचे काही हफ्ते करून द्या. वीज बिल वसुलीसाठी वीज रोहित्र बंद करण्याची कार्यवाही न करता अखंडपणे वीज प्रवाह सुरु ठेवावा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांना केल्या आहेत.





