कोपरगाव शहरात शिवजयंती उत्साहात साजरी.

Shiva Jayanti celebrations in Kopargaon.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 19Feb 2021, 18:30

कोपरगाव : शहरात १९ फेब्रुवारी २०२१ रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फटाक्यांची आतिषबाजी करत तुतारींची सलामी देत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी पहाटे नगरपालिकेच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे नगराध्यक्ष विजय वहाडणे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, नगरसेवक अधिकारी कर्मचारी यांच्या हस्ते सपत्नीक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची अभिषेक पूजा करण्यात येवून आरती करण्यात आली यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी नगरसेवक या अभिषेक पूजनास उपस्थित होते.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास आ.आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे अभिवादन करताना

तसेच यावेळी आमदार आशुतोष काळे युवक नेते विवेक कोल्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजप-शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सर्व नगरसेवक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आकर्षक विद्युत रोषणाई भगवे झेंडे पताका आदींनी सजविण्यात आले होते. तरुण-तरुणी डोक्याला भगवे फेटे आकर्षक पेहराव करून मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय भवानी जय शिवाजी असा शिवाजी महाराजांचा यावेळी जय जय कार करण्यात आला. शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले काही ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले मोटरसायकल, सायकल, चार चाकी वाहने यांना मोठ मोठाले भगवे ध्वज लावण्यात आले होते. संपूर्ण शहरात जिकडे-तिकडे च भगवे वातावरण दिसत होते पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

You cannot copy content of this page