नंगी तलवार फिरवत रस्त्यावरून माथेफिरू चा धिंगाणा, पोलिसांनी केली अटक
Dhengana of Mathefiru wielding a naked sword, arrested by the police
कोपरगांव : शहरात आज शिवजयंतीचे उत्साहपूर्ण वातावरण असतांना एका माथेफिरु युवकाने अंगात भगवा वेष घालून हातात तलवार घेवून रस्त्याने धिंगाणा घातल्याची घटना सकाळी ९ वाजणेचे सुमारांस भगवा चौक ते कन्या शाळा दरम्यान घडली.
हातात तलवार असलेल्या या माथेफिरुने प्रत्येकाला तलवारीने मारण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी रस्त्याने जाणारे नागरीक जिव मुठीत धरुन पळत सुटत होते हल्ल्यात एक जखमी झाला आहे. या संबंधी माहिती अशी की, शहरभर आज शिवजयंतीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा झाला सगळीकडे भगवे झेंडे व पताका यामुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले अनेक युवक,युवती व लहान मुलांनी भगवा वेश परिधान करुन या उत्सवात सामिल झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत असतांना आज दि १९ रोजी सकाळी ९ वाजणेचे सुमारास अंगात भगवा वेष काळी पँट दाढी वाढलेला एक माथेफिरु युवक अचानक भगवा चौकातून प्रगटला त्याचे हातात तलवार होती, तो सुसाट सुटला त्याचे मागे त्याची बहिण आई हे देखील धावत होते सदर युवक हातातील तलवारीने येणार्या जाणार्यांना तलवारीचा धाक दाखवत होता तसेच अंगावर धावून येवून तलवारीने मारण्याचा प्रयत्न करीत होता. अनेक लोक जिव मुठीत धरुन सैरावैरा पळत होते, अशातच हा युवक पंजाब नॅशनल बँकेजवळ आला असता गवळी यांच्या इमारतीजवळून एक स्कुटरवाला जात होता तो जोरात होता त्याचे अंगावर या माथेफिरुने तलवार मारली त्यात तो जखमी झाला त्याची स्कुटर पडली व तो धुम पळत सुटला. दरम्यान ही घटना घडत असतांना दोघे तिघे मोटर सायकलवरुन जात होते त्यांच्याही अंगावर सदर युवक मारण्यासाठी तलवार घेवून धावला नंतर तो एस. टी. स्टॅन्डच्या दिशेने तलवार फिरवत फिरवत निघुन गेला, त्याला आवरण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही प्रत्येकाला आपला जीव प्यारा होता. दरम्यान साडेनऊ वाजेच्या सुमारास हा युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्यासमोर आला असता तेथे असलेल्या पोलिसांनी त्याला पोलिसांनी पकडले या माथेफिरु युवकाचे नाव आकाश नारायण कुंढारे वय २४ वर्षे रा.महादेवनगर कोपरगाव असून त्यास
पोकॉ/२६२२ संभाजी भीमराज शिंदे नेम.कोपरगाव शहर पो स्टे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आरडा ओरडा करून लोकांमध्ये दहशत पसरवून शांतता भंग केला आहे.आर्म अक्ट ४/२५ तसेच महा. पो.का.क.११०/११२ प्रमाणे पोलीसांनी ताब्यात घेतले आहे व त्याचेवर प्रतिबंधात्मक कारवाई होत आहे. सदरची घटना ही पंधरा मिनीटे ते अर्धा तास घडली परंतु अतिशय थरकाप होणारी घटना होती.
शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाने हे तपास करीत आहेत.