पोलीस निरीक्षक गवळी गेले, देसले आले
The police inspector Gavli went , Desale came
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 24Feb 2021, 10:00
कोपरगाव :कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांची अवघ्या दोन अडीच महिन्यात बदली झाली. त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे शहर पोलीस स्टेशनचा कारभार सांभाळणार आहेत.तर पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे शिर्डी साईबाबा मंदिर सुरक्षा व्यवस्थेचा कार्यभार राहणार असल्याची माहिती कळते .
पो.नि.राकेश माणगावकर यांची बदली कोतवाली पोलीस ठाणे येथे दि.११ नोहेंबर रोजी झाली होती. त्यानंतर २९ नोहेंबर रोजी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचा कारभार हाती घेतला होता.
अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी दि.२३ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला आहे.