शहरातील अतिक्रमणे काढा; मुख्याधिकाऱ्यांना पंधरा दिवसापूर्वीच दिले पत्र वहाडणेंचा खुलासा

शहरातील अतिक्रमणे काढा; मुख्याधिकाऱ्यांना पंधरा दिवसापूर्वीच दिले पत्र वहाडणेंचा खुलासा

Remove city encroachments; Disclosure of the letter given to the Chief officer fifteen days ago

कोपरगाव : शहरातील जेवढी अतिक्रमणे झाली आहेत ती तातडीने काढून टाकावीत म्हणून मी पंधरा दिवसांपूर्वीच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना लेखी पत्र दिले असल्याचा खुलासा नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मागील पत्रकार परिषदेमध्ये वहाडणे यांनी आपण २७ तारखेच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा खुलासा करणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली होती, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी काल शनिवारी (२७)दुपारी पत्रकार परिषद आयोजित केली होती.

या पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विद्यमान उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, योगेश बागुल, कैलास जाधव, संजय सातभाई, शिवाजी खांडेकर माजी नगरसेवक बबलू वाणी यासह त्यांनी सत्ताधारी नगरसेवकांवर विविध आरोप केले तर काहींची आपल्या नेहमीच्या खास शैलीत पोलखोल केली. एवढ्यावरच न थांबता वहाडणे यांनी  येत्या आठ ते दहा दिवसात मी परत पत्रकार परिषद घेऊन नगर परिषदेच्या विविध ठेकेदारांना कोणते नगरसेवक पैशाची मागणी करतात विविध बिलातून आम्हाला वाटे द्या असे म्हणणाऱ्या नगरसेवकांची नावे जाहीर पणे सांगणार असल्याची घोषणाही पत्रकार परिषदेत केली आहे, चोवीस ते आठ तास पाणी वापरणाऱ्या बोक्यांचीही नावे मी जाहीर करणार आहे असे त्यांनी पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले. वहाडणे यांनी केलेल्या पोल-खोल मुळे दोन्ही थड्यावर हात ठेवणारे चांगलेच अडचणीत आले आहे. त्यांची गत “ना घर का ना घाट का” अशी झाली आहे थोडक्यात त्यांचे गळचेपी धोरण त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. तर ज्यांनी मौन पाळले तेही याठिकाणी उघडे पडले आहेत,  तेंव्हा आता त्यांनाही तोंड उघडण्याशिवाय गत्यंतर नाही, आता वहाडणे यांनी केलेल्या आरोपाला हे नगरसेवक कशा पद्धतीने उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page