सासऱ्याचा सुनेवर बलात्कार, नात्याला काळिमा फासणारी घटना

सासऱ्याचा सुनेवर बलात्कार, नात्याला काळिमा फासणारी घटना

Rape of father-in-law on daughter-in-law

आरोपी सासरा फरार, नवऱ्याला अटक  Accused father-in-law absconding, husband arrested

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 28Feb 2021, 19:00

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यामध्ये सासऱ्याने सुनेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना, कोपरगाव ग्रामीण पोलीस  ठाण्यात ही धक्कादायक तक्रार दाखल झालीय.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
फिर्यादी हिचा विवाह शिरसगाव येथील तरुणाशी झालेला होता. सदर महिला हि ऑगष्ट २०१८ मध्ये पहिल्या आठवड्यात फिर्यादी ही आपल्या सासरी  एकटीच घरी असताना सासरा याने तिचे वर वेळोवेळी बळजबरीने संभोग केला व शिवीगाळ दमदाटी केली, ही बाब फिर्यादी महिलेने आपला आरोपी नवरा यास सांगितली असता त्याने पण फिर्यादीस मारहाण केली. हा प्रकार उघड न करण्यासाठी वारंवार धमक्या दिल्या जात होत्या. मोठा निर्धार करून काल रात्री आठ वाजेच्या सुमारास अखेर सुनेने तक्रार नोंदवली.
दरम्यान या महिलेने गुन्हा दाखल करण्यास उशीर का केला असा सवाल चौकशी पोलीस अधिकाऱ्यांना केला असता त्यांनी सदर फिर्यादी महिलेच्या वडीलांचे निधन झालेले असून आई आजारी असल्याने व ती भीतीने ग्रस्त असल्याने गुन्हा उशिरा दाखल केल्याची माहिती  दिली. 
  
आरोपी सासरा हा फरार झाला असून, नवऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे  बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, धमकावण्याचा गुन्हा दाखल झालाय, अशी माहिती  पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिलीय.  
 नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनं कोपरगाव तालुक्यामध्ये खळबळ उडालीय. 

Leave a Reply

You cannot copy content of this page