”ती” ला  घडविता घडविता मीही घडले

महिला दिन २०२१: ‘ती” ला  घडविता घडविता मीही घडले

Women’s Day 2021: It just so happened that “she” happened

माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची दीर्घ मुलाखत Long interview with former MLA Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 8March 2021, 7 :20

कोपरगाव राजेंद्र सालकर Kopargaon Rajendra Salkar

कोपरगाव :स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप. आपल्या प्राचीन लोकांनी याला मान्यता दिली म्हणून वैदिक काळात स्त्रियांना उच्च आदर दिला जात होता. सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा  स्त्रीच्या शक्तीरूपाने पुजले जातात, घर असो की समाज जिथे  स्त्रीचा सन्मान केला जातो तिथे आनंद उत्साह नांदतो . पण ज्या घरात व समाजात  स्त्रीचा अनादर अपमान होतो क्या घरात व समाजात दुःख, व दैन्य  वास करते, म्हणूनच स्त्रीला समान दर्जा दिला पाहिजे  . ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’ हे प्रसिद्ध विधान  झाले.‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते’ हे प्रसिद्ध विधान झाले. मीराबाई – प्रेम आणि वैराग्य, लक्ष्मीबाई – धर्य आणि निश्चय आणि सीता – शुद्धता आणि निष्ठा. सतीच्या रूपाने त्यांनी अलौकिक बलिदान आणि सावित्रीच्या रूपाने मृत्यूला सुद्धा तुरी दिली.आशीर्वाद म्हणून लाभलेल्या या शक्तीला राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर माता रमाबाई आंबेडकर यांनी आपले योगदान दिले आहे,

मी एक गृहिणी

एक गृहिणी म्हणून    आजही सर्वांची काळजी घेते, . घरची शेती आणि पशुपालनाची जबाबदारीही अगदी आनंदाने  बघते आहे, घर काम करताना मला अनेक अडचणी व अनेक प्रश्न भेडसावत या प्रश्नातूनच मला महिलांच्या प्रश्नांची उकल झाली, महिलांचे प्रश्न बघून तळमळ वाटली त्यातून महिला मंडळाची स्थापना केली महिला मंडळाच्या स्थापनेतून स्त्रियांना जोडण्याचे काम केले परंतु हे करीत असतांना त्यांची होणारी आर्थिक कुचंबणा लक्षात आली यासाठी महिला बचत गटाची संकल्पना डोक्यात खेळू लागली त्या दिशेने पाऊल उचलले

महा विकास आघाडी सरकारच्या विरोधात वीज बिल माफी, दूध आंदोलन, वीज बिलांची होळी, आदी आंदोलनात सहभाग घेताना भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे

महिला बचतगट आणि सक्षमीकरण

स्वतःच्या समस्या स्वतःच्याच पध्दतीने स्वतःच सोडविता येण्याची क्षमता स्त्रियांना लाभली पाहिजे. त्यांच्याकरिता म्हणून दुसरा कोणी ते कार्य करू शकत नाही आणि कोणी ते करूही नये. जगातल्या कोणत्याही स्त्रिया इतक्याच योग्यतेने भारतीय स्त्रियाही ते काय करू शकतील, असे उद्गार स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल स्वामी विवेकानंद यांनी काढले होते. आज महिला बचत गट या संकल्पनेवर काम करताना २० वर्षात ते पदोपदी जाणवते. स्त्रियांबद्दल विश्वास व त्यांची कसोटी इतिहासकालीन घटनावरून अधोरेखित होते. २१ व्या युगातील भारत महासत्ता विकासाकडे घेणारे झेप यात स्त्रीशक्तीचा ५० टक्के वाटा अस्तित्वाने जरी असला तरी खरी कार्यशक्तीतूनच त्याची प्रचिती येऊ शकते. महिला बचत गट आज लाखोच्या घरात कार्यरत आहे. महिलांनी महिलांच्या विकासासाठी परस्पर समन्वयातून बचतीच्या माध्यमातून साधलेले एकत्रीकरण म्हणजे महिला बचतगट होतात यात स्वावलंबन, एकसारखी बचत समूहशक्ती या त्रिसुत्रीचा वापर केला जातो. महिलांचे सक्षमीकरण महिला बचतगटाने कसे साध्य केले याच्या खरं तर यशोगाथा अनेक वेळा आपण पहातो, ऐकतो पण माझ्या मते स्त्रीचे सक्षमीकरण टप्प्याटप्प्याच्या प्रक्रियेवर आधारीत आहे. मानसिक सक्षमीकरण, आर्थिक सक्षमीकरण, सामाजिक सक्षमीकरण, राजकीय सक्षमीकरण, आर्थिक व्यवहार कसे करावेत त्याचे सुक्ष्म नियोजन व्यवस्थापन, देखरेख नियंत्रण यातून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे. एका वेळेची खाण्याची भ्रांत असलेल्या सावकारशाहीच्या कर्जात बुडालेल्या महिलांनी बचत गटात सहभागी होऊन आता आपल्या गरिबीवर मात केली आहे. २५०० महिला बचतगट तयार करून सुमारे ३२००० महिलांना या प्रवाहात आणल्याने ही महिला बचतगटाची चळवळ आज एकत्रित कोटींची उलाढाल त्यांच्या स्वभांडवलातून उभा करत इतिहास निर्माण केला आहे.

महापूर असो अवकाळी पाऊस असो की कोरोना कोपरगावकरांच्या संकटकाळात सामाजिक मदतीचा सामाजिक वसा जपणारा कोल्हे परिवार

स्त्री ही अबला नसून सबला आहे

हे अनुभवांन्ती सिद्ध करून आता रडायचे नाही तर लढायचे हा मूलमंत्र दिला हजारो बचतगट शेतमालावर प्रक्रिया करून टाकाऊपासून टिकाऊ बचतीतून अर्थार्जन उद्योग व्यवसाय कौटुंबिक प्रगती,सामाजिक उपक्रम व शेवटी राजकीय स्तरावर कामगिरी बजावत आहे. पशुपालनाची जबाबदारी सांभाळत असताना गोठा साफसफाई सर्वकाही घरातील स्त्रियाच   करतात परंतु आर्थिक उत्पन्न मात्र पुरुषांच्या हातात असते म्हणून स्त्रीच्या हातात पैसा राहावा यासाठी शेतीबरोबर दुग्ध व्यवसायाचीही जोड दिली आज   दुग्ध व्यवसायातून पैसा थेट महिलांच्या  हातात  जमा होत आहे.  बचत गट चळवळीच्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे मुला मुलींचे शिक्षण छोटे-मोठे उद्योग आर्थिक उन्नती या बरोबरच ती सफल होण्यास मला ताकद देता आली स्त्री ही अबला नसून सबला  आहे आपल्याला रडायचे नाही तर लढायचे आहे हा वेळोवेळी सांगीतलेला मुलमंत्र तिने लक्षात ठेवून प्रत्यक्षात आणला त्यामुळे तिने  आपल्यातील न्यूनगंड बाजूला ठेवून अशिक्षितपणावर मात केली आणि ती यशस्वी झाली तिच्या चेहर्‍यावरील समाधानाचे भाव हीच माझी खरी कमाई आहे बचत गट चळवळीच्या माध्यमातून स्त्री  सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यामुळे मी आत्मिक समाधान इतर होतेच परंतु जिच्या साठी काम केले तिच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून माझा आनंद द्विगुणित होतो

तिला  घडविता घडविता मीही घडले

बचत गटातील सामाजिक नेतृत्व हे राजकीय क्षेत्रातही अग्रेसर ठरले, आणि कोपरगावची पहिली महिला आमदार होण्याचा मान सौ स्नेहलता कोल्हे म्हणून मला मिळाला हे बळ फक्त या चळवळीतून मिळाले. धाडसी समाधारिष्ट्य नेतृत्वगुण विकासाला लागण्याचे काम केवळ महिला बचत गटातील कार्यपध्दती व व्यवस्थापन यातून शिकावयास मिळाले. सन २०१४ मधील लोकाग्रहास्तव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविली मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन एका गृहिणीने विधानसभेपर्यंत झेप घेतल्याचा तो अविस्मरणीय क्षण होत. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पहिली महिला आमदार होण्याचा मान मिळाला सासरी माहेरी राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे मला सामान्य घटकांच्या प्रश्नाची व मतदार संघातील प्रश्नांची जाण होती त्यामुळे युतीचे सरकार आपले सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून सभामंडप सांस्कृतिक सभागृह रस्ते पूल पाणी पुरवठा योजना सबस्टेशन विद्युत रोहित्र अशी अनेक लोकोपयोगी कामे झपाट्याने पार पाडता आली शहरासाठी चाळीस कोटींहून अधिक निधी आणून  विकासकामे करता आली.

निळवंडे पाण्याला विरोधाचे पाप केले

अद्यावत बस स्थानक नगरपालिका इमारत नगरपालिका वाचनालय इमारत विविध रस्ते अग्निशमन केंद्र अशा वास्तू उभ्या करता आल्या शहरासाठी अद्ययावत नाट्यगृह साठी दोन कोटीचा निधी उपलब्ध केला परंतु राजकीय अनास्थेमुळे हे काम आज दुर्लक्षित राहिल्याचे शैल्य मनाला बोचते आहे कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी निळवंडे शिर्डी कोपरगाव बंद पाईप पाणी योजना अनेक संकटावर मात करुन श्री  साईबाबा संस्थांच्या मदतीने पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला नव्वद टक्के यशही मिळाले विरोधकांचे दिशाभूल करणारे व गलिच्छ राजकारण षडयंत्र या माध्यमातून हा प्रश्न न्यायालयात नेऊन ठेवला त्यामुळे काम रखडले पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाकडे राजकारण म्हणून पाहिले नसते तर हा प्रश्न मार्गी लागला असता केवळ राजकारणामुळे कोपरगाव शहराचे पाणी गढूळ झाले आहे  अशी खंत मनात आहे. अनेक जलतज्ञ यावेळेस निर्माण झाले कोपरगाव च्या पाणी प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याच्या वल्गना केल्या  लोकांची दिशाभूल करून तात्पुरती मते मिळवून निवडणूक  जिंकण्यात आली परंतु दीर्घकाळाच्या राजकारणात ही मंडळी निश्चित उघडे  पडतील. नको कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तर माझी आमदारकी सार्थकी लागेल असे मी  वारंवार म्हणत होते परंतु तो  संदेश जनतेपर्यंत कदाचित पोहोचला नसावा    आजही निळवंडे पाणी कोपरगाव शहरात आणण्याची   चिकाटी मी सोडली नाही व सोडणार नाही तेवढ्याच ताकतीने पुन्हा पुन्हा लढा देणार आहे पाठपुरावा करणार आहे. त्याचबरोबर  कोपरगाव मतदार संघातील गावोगावचा   पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या, हे करीत असताना निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्यासाठी व कोपरगाव गोदावरी कालवे दुरुस्तीसाठी सातत्याने पाठपुरावा केला  गोदावरी कालव्यांचे रुंदीकरण व्हावे आजही यासाठी मी आग्रही आहे कोपरगावात एकमेकाशी काम करण्याची स्पर्धा करण्यापेक्षा दुर्दैवाने पिण्याच्या पाण्याच्या पुण्याच्या कामातही ज्यांनी अडथळे आणण्याचे पाप केले त्यांना देव सुद्धा माफ करणार नाही   

तू काम खूप चांगले केले परंतु तुला राजनीति समजली नाही

केलेल्या कामाची शिदोरी पाठीशी असताना सन २०१९ च्या निवडणुकीस उभे राहिले जिंकण्यासाठी मी एकटी लढत होते परंतु मला हरविण्यासाठी अनेक जण एकत्र आले होते. षडयंत्र रचले गेले, कुरघोड्या केल्या गेल्या, तात्पुरत्या अपेक्षा दाखवून निवडणूक जिंकण्यापुरते डावपेच आखले गेले होते त्यामुळे पराभव माझा एकटीचा असला तरी हार मात्र अनेकांची झाली आहे. यावेळी आमदार म्हणून माझ्या कामाची व्याप्ती पाहून माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे तू माझ्यापेक्षा चांगले काम करते ही कौतुकाची थाप माझ्या राजकीय प्रवासातील सर्वोत्तम पावती होती.तर विधानसभेतील पराभवानंतर तू काम खूप चांगले केले परंतु तुला राजनीति समजली नाही हे त्यांचे अनुभवातील वाक्य तीच त्यांची बोलकी प्रतिक्रिया मला खुप काही सांगुन गेली .

समाज सेवा हाच  कोल्हे परिवाराचा वारसा

मला पडलेल्या मतांचा आदर राखून आजही मी लोकांचे प्रश्न सोडवित आहे, हे काम करीत आहे व सातत्याने करीत राहणार आहे. हे सामाजिक बांधिलकी पद असो वा नसो ही सामाजिक बांधिलकी जपणे हा कोल्हे परिवाराचा वारसा आहे म्हणूनच निवडणुकीनंतर शहरावर तालुक्यावर आलेले पूर परिस्थिती साथीचे आजार पिण्याच्या पाण्याचे गंभीर प्रश्न यामध्ये सातत्याने संजीवनी उद्योग समूह आणि कार्यकर्ते त्या त्या वेळी जनतेच्या मदतीला धावून गेलो ही खंडित परंपरा अव्याहत अविरत सुरु आहे जागतिक महामारी  कोरोना  साथीच्या काळात लॉक डाऊन करण्यात आलेले सर्व व्यवहार ठप्प होते छोटे मोठे व्यवसाय करुन पोट असलेल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला त्यांना दिलासा देण्याबरोबर आर्थिक तरतूद व इतर मदत केली बचत गटाच्या महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देताना सुमारे तीन लाख लाख मास्क तयार करण्याचे काम केले आजाराचा प्रादुर्भाव  होऊ नये औषध फवारणी केली या काळात सेवा देणाऱ्या अनेक कोरोना योद्ध्यांना या कामासाठी आवश्यक साधनांचे वाटप केले स्त्री  म्हणून काम करीत असताना येणाऱ्या अडचणी निश्चितच आव्हानात्मक होत्या परंतु धैर्य चिकाटी मेहनतीच्या जोरावर यावर मात केली हे काम करीत असताना एकीकडे विकृत प्रवृत्तीकडून इतर महिला आमदार प्रमाणे मलाही  खुनाची धमकी देण्यापर्यंत मजल गेली त्यामुळे शासनाकडून मला पोलिस संरक्षण दिले गेले  सोशल मीडियातून कशी गलिच्छ मेसेज द्वारे मानसिक त्रास शेतकरी संपाच्या वेळी खराब मेसेजेस कार्टून करून सोशल मीडियातून बदनामी करण्याचे प्रयत्न पाच वर्ष सातत्याने काही निवडक मंडळी मंडळी हाती घेतले होते मात्र आता सर्व प्रश्न सुटल्यासारखे ते गप्प बसले आहेत मला किती मानसिक त्रास दिला तरी मी थकणार नाही आणि थांबणार नाही जनतेच्या सेवेचा वसा टाकणार नाही कारण माझ्या समोर जिजाऊ सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आहे राजकारणात समाजातील पुरुषी मानसिकतेचा आजही महिलांना कमी लेखणे अपमानित करणे त्रास देणे अर्थ पुरुषार्थ माननारी मंडळी आहे.

भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव

भारतीय जनता पार्टीने आज माझ्यावर प्रदेश सचिव पदाची जबाबदारी दिली आहे या जबाबदारीतून मी सातत्याने गेल्या वर्षापासून केंद्र मोदी सरकारच्या केंद्रातील मोदी सरकारचे ध्येय धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचविणे यांना लाभ मिळवून देणे त्याचबरोबर वीज प्रश्न अनुदाने शेतकरी कर्जमाफी अशा विविध प्रश्नावर आजही रस्त्यावर येऊन महाविकास आघाडीच्या सरकारला जाब विचारण्याची दायित्व पार पाडीत आहे समाज माझ्या बरोबर आहे महिला माझ्या बरोबर आहेत. कोल्हे परिवार आणि जनसेवेचे व्रत उचलले आहे हे जनसेवेचे हा जनसेवेचा वसा मी सतत चालू ठेवणार आहे

 

तिला  घडविता घडविता मीही घडले

बचत गटातील सामाजिक नेतृत्व हे राजकीय क्षेत्रातही अग्रेसर ठरले, आणि कोपरगावची पहिली महिला आमदार होण्याचा मान सौ स्नेहलता कोल्हे म्हणून मला मिळाला हे बळ फक्त या चळवळीतून मिळाले. धाडसी समाधारिष्ट्य नेतृत्वगुण विकासाला लागण्याचे काम केवळ महिला बचत गटातील कार्यपध्दती व व्यवस्थापन यातून शिकावयास मिळाले. सन २०१४ मधील लोकाग्रहास्तव विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढविली मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन एका गृहिणीने विधानसभेपर्यंत झेप घेतल्याचा तो अविस्मरणीय क्षण होत. कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पहिली महिला आमदार होण्याचा मान मिळाला सासरी माहेरी राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे मला सामान्य घटकांच्या प्रश्नाची व मतदार संघातील प्रश्नांची जाण होती त्यामुळे युतीचे सरकार आपले सरकार असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या माध्यमातून सभामंडप सांस्कृतिक सभागृह रस्ते पूल पाणी पुरवठा योजना सबस्टेशन विद्युत रोहित्र अशी अनेक लोकोपयोगी कामे झपाट्याने पार पाडता आली शहरासाठी चाळीस कोटींहून अधिक निधी आणून  विकासकामे करता आली.

अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या हातून जनसेवा घडू दे

कोरोना ग्रस्त झाल्यानंतर नाशिक येथील सुश्रुत हाॅस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेे. माझी लढाई सुरू होती, उपचार चालु होते. ५ दिवसात घरी सोडणार तर अचानक ताप वाढला पुढे तब्बेत ढासळली. ऑक्सीजन वर रात्रंदिवस राहावे लागले. १९ दिवस रात्रंदिवस ऑक्सिजनवर होते. त्या दिवसामध्ये झालेला शाररीक, मानसिक त्रास, औषधे , इंजेक्शनचा भडिमार भयंकर युध्द शरीरात चालले होते. आपली ऑक्सिजनची परिस्थिती काय आहे, या समोरच्या स्क्रिनकडे नजर ठेवून जगणं चीड आणणारे होते. या विषाणूला रोखण्यासाठी कुठलीही लस नसल्याने हायर अँटिबायोटिक्स दिले जात होते, त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम खोलीत आजुबाजुला आणखी कुणीही व्यक्ती नाही. फक्त डोळेच दिसणारे पीपीई किट घातलेले डाॅक्टर्स, सिस्टर,ब्रदर या कोविड योध्दयांषिवाय कोणीही नाही. एकटेपणाचा भास नव्हे तर वास्तव स्विकारावेच लागत होते, पाणावलेल्या डोळयातील अश्रुंचा कधी बांध फुटायचा कळत नसायचे. सातत्याने ऑक्सीजन वर जगण्यासाठी संघर्ष करण्याची हि पहिलीच वेळ होती.
मरणाला मी घाबरत कारण मी रडणार नाही तर लढणारी आहे, पण अशा बंद खोलीतील भ्याड आणि शूद्र मरण मला नको मी परमेश्वराला एकच मागणे मागते मला लोकांचे काम करता करता मरण येउदे अखेरच्या श्वासापर्यंत मला जनसेवेचे काम करता येऊ दे, जीवन-मरणाच्या या लढाईत मला अनेकांचे आशीर्वाद शुभेच्छा या वेळी कामी आल्या माझ्या हातून राहिलेली जनसेवा करण्यासाठीच माझा पुनर्जन्म झाला असे मी मानते .

महिलांना आरक्षण बरोबर संरक्षणाची गरज 

महिलांना राजकीय आरक्षण मिळाले परंतु आजही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण असतानाही पुरुष तोंडवळा दिसतो त्यामुळे महिलांना  आपली क्षमता आपली क्षमता सिद्ध करताना अडचणी येतात आज आरक्षण असले तरीआज महिला कुठेही सुरक्षित नाही  कोरोनाग्रस्त असतानासुद्धा कोरोणा सेंटरमध्ये महिलांवर झालेले अत्याचार बघता  खर्‍या अर्थाने संरक्षणाची गरज आहे. एक स्त्री म्हणून काम करत असताना येणाऱ्या अडचणी निश्चितच आव्हानात्मक होत्या परंतु धैर्य चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यावर मात केली सामाजिक बांधिलकी समाजाविषयीचे आपले पण या कामाला बळकटी देतात ते प्रकर्षाने जाणवले स्त्री ही अबला नाही तर सबला आहे ते कोठेही कमी नाही हे तिने वेळोवेळी सिद्ध केले आहे स्त्री   शक्तीच्या ताकदीचा  उपयोग सर्व क्षेत्रात झाला तर देश निश्चितच प्रगतीपथावर असा विश्वास शेवटी आपल्या या दीर्घ मुलाखतीत व्यक्त केली.

 महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

 

Leave a Reply

You cannot copy content of this page