आम्ही तोंड उघडले तर वहाडणेंना शहरात फिरता येणार नाही: पत्रकार परिषदेतून सडेतोड उत्तर

आम्ही तोंड उघडले तर वहाडणेंना शहरात फिरता येणार नाही: पत्रकार परिषदेतून सडेतोड उत्तर

If we open our mouths, we will not be able to walk around the city: a blunt answer from the press conference

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 1March 2021, 21:20

 

कोपरगाव : नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी एका पत्रकार परिषदेत पराग संधानसह सेना-भाजपाच्या नगरसेवकांवर सडकून टीका केली असताना आता सेना-भाजप नगरसेवकांनी एका पत्रकार परिषदेमधून विजय वहाडणे यांना प्रत्युत्तर देण्यात आले असून नगरसेवकांनी चौफेर केलेल्या आरोप व टीकेमुळे वहाडणे यांचे वस्त्रहरण झाले आहे. वहाडणे यांच्या पत्रकार परिषदेतही धुरळा उडविताना तेच घडले.

होय माझ्याकडेच हिशोब आहे.
हिशोबाचे काय घेऊन बसलात !
२०१४ च्या विधानसभेच्या हिशोबाचे मी तोंड उघडले तर विजय वहाडणे यांना शहरात फिरता येणार नाही असा इशाराच अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी दिला आहे.

२५ वर्षापासून माझा व्यवसाय कायदेशीर आहे, परंतु केवळ मूळ विषयाला बगल देण्यासाठी बेछूट आणि बेताल आरोप करणाऱ्या वहाडणे यांनी त्यांचा व्यवसाय सांगावा, विघ्नेश्वर मैदानात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जमा केलेल्या पैशाचा हिशोब द्यावा असे मी खुले आव्हान करतो,असे पराग संधान यांनी ठणकावून सांगितले.

कर्तव्य शून्य, बेछूट व बेताल वक्तव्य करणाऱ्या वहाडणे यांची ३० वर्षाची राजकीय कारकीर्द केवळ चार आण्याच्या खडूत बोर्ड बाजी करून मोठ्यांची ईज्जत घेण्यापलीकडे व काळे कोल्हे यांच्या नावाने शंखनाद करण्यापलीकडे काय ? असा टोला भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी लगावला आहे.

आठ कोटी कामांच्या नामंजूरीच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. सत्ताधारी सेना-भाजप नगरसेवकांनी दोन वेळा स्थायी समितीत व तिसऱ्या वेळेस सर्वसाधारण सभेत आठ कोटींच्या कामांना मंजुरी न दिल्यानं शहरातील या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे.

यावरून नगराध्यक्ष वहाडणे यांनी वारंवार सत्ताधारी सेना-भाजप नगरसेवकांवर जोरदार टीका केली होती, सत्ताधारी नगरसेवकाकडून वारंवार टीकेला उत्तरही देण्यात आले होते. मात्र कालपरवाच्या पत्रकार परिषदेत वहाडणे यांनी नगरसेवकांवर खाजगी,व वैयक्तीक पातळीवर जाऊन शरसंधान साधल्याने मात्र त्याच्या तिखट प्रतिक्रिया सत्ताधारी नगरसेवकांच्या गोटातून उमटल्या,

अपेक्षेप्रमाणे विजय वहाडणे यांनी धुरळा उडवला, नवीन असे काहीच न बोलता. त्यांनी तोच कोळसा उगाळून काय साधले? त्यांचा नेहमीचा यशस्वी मुद्दा म्हणजे कोल्हेनी पराभवाचा वचपा काढला, मला काम करू दिले नाही,शहर विकासाला खीळ घालतात, अतिक्रमण काढण्यासाठी मला पुढे करतात, गेल्या साडेचार वर्षापासून हाच राग त्यांनी वारंवार आळवला,

आता आठ कोटीचा मलिदा गमावल्याचे वैफल्य! वहाडणे यांच्या वागण्या-बोलण्यातून स्पष्टपणे दिसत आहे. पातळी घसरल्याने आमचा आवाज दाबण्यासाठी व्यक्ती द्वेषातून आरोप करून बदनामी करण्याचा व एकमेकात भांडणे लावण्याचा केविलवाणी प्रयत्न वहाडणे करीत आहे, वैयक्तिक गोष्टी आम्ही बाहेर काढल्या तरी यांना शहरातून फिरणे मुश्कील होईल पण ती आमची संस्कृती नाही अशा शब्दात उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी जोरदार टीका केली.

विजय कन्स्ट्रक्शन ला बिल देऊ नका असा ठराव मी केला. त्या वेदनेतून सुरू असलेले हे उचकणे आहे. तीन कोटीचा चेक तुम्ही दिला, मलिदा तुम्ही खाल्ला आम्हाला उल्लू बनवतात का ? अशी टीका विजय वाजे यांनी केली.

सर्विस स्टेशनची जागा मी विकत घेतल्याचे सांगत , समाजसेवक अण्णा हजारे यांना बोलावून खाऊंगा ना खाने दुंगा या शपथविधीची आठवण करून दिली, दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अण्णा हजारे यांना बोलावून पालिकेचा वार्षिक अहवाल मांडणार होता तो कुठे गेला ? आम्ही संघटनेचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा केला, तुमचा वंदेमातरमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे गेला ? जागा गवारे यांची पण अतिक्रमण तुमचे ना ? अख्ख गावं नालायक तुम्ही मात्र सावं, येत्या निवडणुकीत वार्डात उभे राहा, म्हणजे लायकी कळेल, अशी घणाघाती टीका कैलास जाधव यांनी केली.

बबलू वाणी यांनी निकाल आपल्या बाजूने लागलेला आहे, एक तर ते तीस गुंठे नगरपालिकेने खरेदी करून आपल्याला पैसे द्यावेत , अन्यथा आरक्षण उठवावे अशी रास्त मागणी केल्याचे सांगितले, या पद्धतीने आजपर्यंत अशी अनेक आरक्षणे पालिकेने उठवली आहेत. त्यात गैर काय आहे.

मला कोणीही सोडून गेलेले नाही जे होते आणि आहेत ते आजही माझ्या जवळ आजही आहेत पण आपले आपल्याला का सोडून गेले यावर वहाडणे यांनी आत्मचिंतन केले तर बरे होईल पण स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे पाहावे वाकून अशा भूमिकेत आमच्या जुन्या मित्रांनी स्वत:ला रंगवून घेतले आहे.सातभाई घराणे गेल्या ५० ते ५५ वर्षापासून पालिकेत आहे सुदैवाने सर्व पाणी योजना सातभाई घराणे काळातच झाल्या, हॅलोजन पथदिव्यांची सुरुवात आमच्या च्या काळात झाली, शहरातील अनेक ठोस कामे आमच्या च्या काळात झाली, साडेचार वर्षात तुमचे एखादे तरी ठोस काम दाखवा, शहराचे साडेचार वर्षे वाईट गेले विनंती करतो शेवटचे सहा महिने व्यवस्थित काढा असा टोला संजय सातभाई यांनी लगावला.

शिवाजी खांडेकर यांनी नगराध्यक्षांनी भांडणे लावण्याचे काम करू नये अशा शब्दात सुनावले.

शिवसेना गटनेते योगेश बागुल

योगेश बागुल यांनी सांगितले ३ लाखाच्या वर इस्टिमेट असलेली कामे ऑनलाइन टेंडर पद्धतीने द्यावी लागतात, मग माझ्या सांगण्यावरून ८५ लाखाचे काम वहाडणे मला कसे देणार होते ?असा सवाल करून खरे तर वहाडणे यांनी एक लाखाच्या आत कामे दाखवून साडेतीनशे ते चारशे शिफारसी आपल्या बगलबच्च्यांना देऊन भ्रष्टाचार केल्याचा आरोप योगेश बागुल यांनी केला मागील प्रोसिडिंग मध्ये भ्रष्टाचाराचा वास आला म्हणूनच विरोध केला.साडेचार वर्षे साथ दिली. परंतु आता यापुढे नाही जिथे भ्रष्टाचार तिथे बहुमताचा हिसका दाखविणाराच असा इशारा बागुल यांनी शेवटी दिला.

या पत्रकार परिषदेस पराग संधान, संजय सातभाई, रवींद्र पाठक, स्वप्निल निखाडे, योगेश बागुल, विजय वाजे, जनार्धन कदम, शिवाजी खांडेकर, दत्ता काले, बबलू वाणी, विनोद राक्षे, वैभव गिरमे, विवेक सोनवणे, आरिफ कुरेशी, बाळासाहेब आढाव, प्रदीप नवले श्री कांबळे जपे शिवसेना भाजप नगरसेवक हजर होते.

चौकट
सर्वे नंबर २१०/१ पैकी क्रीडा संकुल व पोलीस परेड ग्राऊंड चे पालिकेचे आरक्षण असलेल्या जागेचे मालक येवला येथील पुरुषोत्तम विठ्ठलदास गुजराती हे शंकरराव गिरमे कधी झाले ? अशी खिल्ली उडवत केवळ खोटेनाटे बोलून वहाडणे भाजपच्या नावाखाली सहानुभूती मिळवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली

Leave a Reply

You cannot copy content of this page