कोपरगावात मनसेचे सभासद नोंदणी अभियान सुरू- सतीष काकडे

कोपरगावात मनसेचे सभासद नोंदणी अभियान सुरू- सतीष काकडे

MNS member registration drive started in Kopargaon- Satish Kakade

महिला तालुकाध्यक्ष सरला मोहिते, तर शहराध्यक्ष पुजा एखंडे, यांना नियुक्तीपत्र देताना जिल्हा अध्यक्ष दत्तू कोते व शहराध्यक्ष सतीष काकडे आदी

मनसे महिला तालुकाध्यक्ष सरला मोहिते, तर शहराध्यक्ष पुजा एखंडे,

MNS women taluka Adhakshaya Sarla Mohite, while city Adhakshaya Puja Ekhande,

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17March 2021, 15 :00

कोपरगाव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरीत होऊन कोपरगाव मनसे शहर व तालुक्याच्या वतीने मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (१६) रोजी शहरातील गांधी चौक स्व. बबलु परदेशी वाचनालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सभासद नोंदणी अभियानाचा प्रारंभ मनसेचे शहराध्यक्ष सतिश काकडे यांनी पहिला फॉर्म भरून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तू कोते, अलीम शहा, अनिल गाडे, विजय सुपेकर, रघुनाथ मोहिते, संजय जाधव, संजय चव्हाण , बापु काकडे, आनंद परदेशी, सागर महापुरे, संजय जाधव जावेद शेख, सचिन खैरे, बंटि सपकाळ, नवनाथ मोहिते, सुनिल सुपेकर, अतिश शिंदे, रवि मोहिते, विशाल खैरे, सुरज चव्हाण, विक्रम काकडे, राज परदेशी, प्रसाद गवळी, अजिंक्य काकडे, सौरभ पवार, कुणाल गाडे, संदिप नाईक, अभी पवार, रोहित गढई, आदि मनसैनिक उपस्थित होते.

अनेक महिलांनी मनसे पक्षात प्रवेश करुन आपले सभासदत्व नोंदविली.
जिल्हाध्यक्ष दत्तू कोते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करुन त्यांची महिला शहर व तालुका कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली यात
कोपरगाव मनसे महिला शहराध्यक्ष पुजा योगेश एखंडे, तालुकाध्यक्ष सरला नवनाथ मोहिते, तर उपतालुकाध्यक्ष रेणुका राजेंद्र जाधव यांचा समावेश आहे.

या वेळी जिल्हाध्यक्ष दत्तू कोते म्हणाले,
मराठी बांधवांच्या न्याय, हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकारणात सक्रिय आहे. एक सक्षम पक्ष म्हणून मनसेची वाटचाल सुरू आहे.
आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीने संघटना सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर आणि तालुका पदांवर अनेक वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी देणार आहे. युवकवर्गांमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे मोठे आकर्षण आहे. त्यांच्या विचाराने पक्षात काम करण्यास मोठ्या संख्येने युवावर्ग तयार आहे. त्यांना संधी देणार असल्याचे दत्तू कोते यांनी सांगितले. मनसेची सभासद नोंदणी सुरू करण्यात आली असून, युवक व महिलांमधून अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असून या वेळी अनेकांनी फाॅर्मव्दारे तर काहिंनी ऑनलाइन सभासद नोंदणी करुन घेतली असल्याची माहिती शहराध्यक्ष सतीष काकडे यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page