माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातील करंजी रस्ता पूर्णत्वाकडे – आगवन
Former MLA Mrs. Snehalta Kolhe’s efforts towards completion of Karanji Road – Agavan
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17March 2021, 18 :30
कोपरगाव : माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतील ९ चारी ते करंजी या रस्त्याचे प्रतीक्षेत असलेले काम पूर्णत्वाकडे असल्याने करंजी ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत असल्याची माहिती करंजीचे उपसरपंच रविंद्र आगवण यांनी दिली.
कोपरगाव वैजापूर मार्गावरील ९ चारी, राज्यमार्ग ६५ ते करंजी गावापर्यंत जाणा-या ग्रामीण मार्ग १८ या रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली होती. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीचा पाठपुरावा करून तत्कालीन आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी सन २०१७-१८ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ३ किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यासाठी १ कोटी ४१ लाख ७० हजार निधी मिळवून देवुन काम सुरू केले होते. आज काम पूर्णत्वाकडे असून करंजी ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. शेतकरी, विदयार्थी व दुध उत्पादक यांचा प्रवास सुखकर होणार आहे, आगवन यांनी ग्रामस्थाच्या वतीने सौ. कोल्हे यांचे आभार मानले.





