खंडणीखोर गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे ; भाजपतर्फे कोपरगावात निषेध आंदोलन
The ransom-seeking Home Minister must resign; Protest agitation by BJP in Kopargaon
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22March 2021, 17 :00
कोपरगाव : महाआघाडीचे सरकार हे खंडणी वसूल करणारे आहे, अशा भ्रष्ट सरकारने नैतिकता ठेवून खंडणीखोर गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा . अशा सरकारचा तीव्र शब्दात भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निषेध केला आहे.
कोपरगाव : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लागलेला खंडणी मागणीचा आरोपाबाबत आयपीएस परमवीर सिंग यांनी राज्यपालासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, आघाडी सरकारचे पितळ उघडे पडले आहे. ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणारी आहे. महाआघाडीचे सरकार हे खंडणी वसूल करणारे आहे, अशा भ्रष्ट सरकारने नैतिकता ठेवून खंडणीखोर गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अशी मागणी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर गुरुद्वारा रोड वर उभे राहून जोरदार घोषणाबाजी करीत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून रस्ता दणाणून सोडला.
राज्यातील जनता कर्जमाफी, वीज बिलमाफी, अवकाळी पाऊस गारपीट, नुकसान भरपाई ची मागणी करीत असताना गृहमंत्री दरमहिन्याला शंभर कोटी हप्ता वसुलीचे आदेश पोलिस अधिकार्यांना देतात ही बाब अंत्यत खेदजनक असून अशा भ्रष्ट सरकारने नैतिकता ठेवून खंडणीखोर गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अशा सरकारचा तीव्र शब्दात भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निषेध केला आहे.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्ता काले,भाजपा गटनेते रवींद्र पाठक, उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे, भायुमोचे अविनाश पाठक, नगरसेवक शिवाजी खांडेकर, सत्येन मुंदडा, माजी शहराध्यक्ष कैलास खैरे, सुशांत खैरे, पिंटू नरोडे, रवींद्र रोहमारे, सोमनाथ अहिरे, बाळासाहेब दीक्षित, शंकर बि-हाडे, किरण सुपेकर,खलिल कुरेशी, यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.