कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात २ किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या आरोपींना मनपरिवर्तनासाठी मार्गदर्शन मेळावा -पो नि. दौलतराव जाधव

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात २ किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या आरोपींना मनपरिवर्तनासाठी मार्गदर्शन मेळावा -पो नि. दौलतराव जाधव

Kopargaon taluka police station to meet the accused with 2 or more crimes for conversion. Daulatrao Jadhav

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 22March 2021, 18 :00

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात २ किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या आरोपींना मनपरिवर्तन होण्यासाठी मार्गदर्शन मेळावा -पो नि. दौलतराव जाधव कोपरगाव : पोलीस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांच्या आदेशानुसार २ किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या आरोपींचे मनपरिवर्तनासाठी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पहिल्यांदाच मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला .

सोमवारी (२२) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी, शिर्डी संजय सातव यांचे मार्गदर्शना खाली आरोपींचे मनपरिवर्तन करणे, हा या मागचा उद्देश असतो. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मार्गदर्शन करण्यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी परिसरात सोशल डिस्टसिंग, मास्क, सॅनिटायझर चा वापर करणेत आला होता. सदर मेळाव्यास २ किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असणाऱ्या यादीमधील २३ आरोपी कोपरगांव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर राहिले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या पुढाकारातून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मार्गदर्शन मेळावा कार्यक्रम घेतला होता. या मेळाव्यात आरोपींचे इंन्ट्रोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले होते, तसेच त्यांचे ५ वेगवेगळ्या अँगलमधून फोटो घेऊन माला विरुद्ध गुन्ह्यातील आरोपी यांची इतर माहिती घेण्यात आली. त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले आरोपी यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा व्हावी म्हणून मार्गदर्शन करण्यात आले अशी माहिती पोनि जाधव यांनी दिली. आतापर्यंत असा कार्यक्रम कोणीही आयोजित केला नसल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. एकदा केलेली चुक पुन्हा करू नका. एक चांगला नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करण्याचे पो.नि. दौलतराव जाधव यांनी मार्गदर्शनातुन प्रबोधन केले.सर्व आरोपी यांना भविष्यात त्यांचे हातून कोणताही गुन्हा घडू नये, जर त्यांचे हातून गुन्हा घडला तर त्यांचेवर करण्यात येणाऱ्या प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाईची त्यांना समज देण्यात आली आहे यावेळी सदर मेळाव्या करिता कोपरगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी अमलदार तसेच तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page