कोपरगाव नगरपालिकेला विविध करापोटी २० कोटी ६७ लाख रुपयांचे येणे-मुख्याधिकारी प्रशांत सरोदे

कोपरगाव नगरपालिकेला विविध करापोटी २० कोटी ६७ लाख रुपयांचे येणे- मुख्याधिकारी प्रशांत सरोदे

20 crore 67 lakh due to various taxes to Kopargaon Municipality-Chief Officer Prashant Sarode

 थकीत बील वसुलीपोटी सहा गाळे  Seal six floors for recovery of overdue bills

गाळे सील करताना नगरपालिकेचे कर्मचारी

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 24March 2021, 18 :30

कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेला घरपट्टी नळपट्टी गाळे भाडे या विविध करापोटी २० कोटी ६७ लाख रुपयांचे येणे असून निव्वळ थकबाकी १५ कोटी २४ लाख रुपये आहे तर चालू मागणी ५ कोटी ४३ लाख रुपये असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली. त्यामुळे कोपरगांव नगरपालिकेने मंगळवारी (दि. २३) पासून वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी वसुली मोहीम तीव्र केली आहे. विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाडे व संकलित व इतर कर थकीत बिल वसुलीपोटी जुनी मराठी शाळा शॉपिंग कॉम्प्लेक्स व बी.ओ. टी.शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील सहा गाळे सील केले. असल्याची माहिती मुख्याधिकारी सरोदे यांनी दिली.

कोपरगांव नगरपलिका घरपट्टी एकूण मागणी ११ कोटी ३१ लाख, थकीत ८ कोटी ४ लाख,पाणीपट्टी एकूण मागणी ७ कोटी ६८ लाख,पैकी थकीत ६ कोटी ६ लाख,.गाळे भाडे मागणी एकूण १ कोटी ६८ लाख, थकीत १ कोटी १४ लाख,असुन एकूण महसूल २० कोटी ६७ लाख असून पैकी १५ कोटी चोवीस लाख निव्वळ थकबाकी आहे तर ५ कोटी ४३ लाख चालू मागणी आहे. लिलाव झालेल्या गाळ्यांच्या अनामत रकमेपैकी २५ लाख रुपये अनामत येणे आहे. असे मुख्याधिकारी सरोदे यांनी सांगितले. मुख्याधिकारी सरोदे म्हणाले,कोरोना कालावधीत लागलेल्या लॉक डाऊन मूळे दुकाने रोजगार बंद होते ही परिस्थिती विचारात घेता मागील दोन वर्षाचे म्हणजेच सन २०१९-२० व सन २०२०-२१ चे गाळे भाडे पैसे भरण्याची सक्ती नगरपालिकेकडून केली जात नाही.परंतु त्यापूर्वीच्या थकबाकी चा भरणा व ज्यांच्याकडे गाळे अनामत रक्कम राहिली आहे त्यांनी ती त्वरित भरावी असे आवाहन पालिकेकडून करण्यात येत आहे. ६ गाळे सील करण्यात आले असून काही गाळेधारकांनी भाडे व करापोटी जागेवर चेक व रोख रक्कम भरून कारवाई टाळली आहे.गाळे भाडे व कर थकीत असलेले गाळे ताब्यात घेऊन त्याचा फेर लिलाव करण्यात येणार आहे. अशाप्रकारची कारवाई येथून पुढे कायम राबविण्यात येणार असून थकबाकीदार व्यक्तींनी आपलेकडे असलेले कर त्वरित भरून कटू कारवाई टाळावी असे आवाहन मुख्याधिकारी सरोदे यांनी केले आहे. सहा गाळे सील करण्याची कारवाई मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्यासह मार्केट विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली. या पथकात मुख्याधिकारी प्रशांत सरोदे , उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्यासह कर व प्रशासकीय अधिकारी योगेश्र्वर खैरे, राजेश गाढे, चंद्रकांत साठे,भाऊराव वायखींडे,रोहित राक्षे विशाल भागवत,अमोल घंगारे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page