संजीवनी फार्मसीचे २३ विद्यार्थी जीपीएटी मध्ये पात्र -अमित कोल्हे
23 students of Sanjeevani Pharmacy eligible in GPAT – Amit Kolhe
महेश जावळे देशात ४९ वा Mahesh Jawale 49th in the country
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 24March 2021, 17 :00
कोपरगांव: नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या देश पातळीवरील जीपीएटी या एम. फार्मसी प्रवेश पात्रता परीक्षेत संजीवनीचे तब्बल २३ विद्यार्थी पात्र झाले असुन महेश परशराम जावळे याने आपल्या प्रतिभा संपन्नतेच्या जोरावर देशात ४९ वा, पवन बालक्रिष्ण कलन याने १२० वा तर चेतन बिरू जानराव याने १४० वा क्रमांक मिळवुन संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला आहे, २३ इतक्या मोठया संख्येने विद्यार्थी पदव्युत्तर फार्मसी अभ्यासक्रमासाठी पात्र झाल्याने संजीवनीची गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री कोल्हे पुढे म्हटले आहे की ग्रॅज्युएट फार्मसी अप्टिट्युड टेस्ट (जीपीएटी) ही देशातील नामांकित फार्मसी महाविद्यालयांमध्ये एम. फार्मसी या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येते. या परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणा दरम्यान प्रत्येकी रू १२,४०० प्रति महिना प्रमाणे २४ महिन्यांच्या कालावधीसाठी एकुण रू २,९७, ६०० इतके स्टायपेंड मिळते. हे सर्व विद्यार्थी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी पदव्युत्तर प्रवेशासाठी पात्र असणार आहे. २७ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आलेल्या देश पातळीवर या ऑनलाईन परीक्षेत एकुण ४७९४२ बी. फार्मसीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यानी नोंदणी केली होती. पैकी ४५५०४ विध्यार्थ्यानी परीक्षा दिली. त्यातील फक्त ४४४७ (फक्त १०. २३ टक्के ) विध्यार्थी पात्र ठरले. त्यात एकट्या संजीवनीच्या २३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ही मोठी उपलब्धी आहे. यात वरील तीन विध्यार्थ्यांव्यतिरीक्त संकेत सिताराम बावके, सुरेश कुशहारी शिंदे , शुभम महारूद्रप्पा कावरे, शैलेश विलास मतसागर, जय अनिल गागरे, प्रियंका गोरख घारे, संयुक्ता संदीप हांडे, वैभव उत्तम लासुरे,शिवानी किशोर आढाव, सायली केदा सोनवणे, ऋतुजा विलास निकम, आदित्य सुदाम मोरे, आकाश पंडीतराव जानराव, क्रिष्णा प्रशांत धोर्डे, हर्षद अरविंद ताकटे, कार्तिकी अशोक वानखेडकर, नेहा अर्जुन बडोगे, कृष्णा वसंत धात्रक, पुजा विजय जाधव व निकीता अनिल वायखिंडे यांचा समावेश आहे. देश व राज्य पातळीवरील वेगवेगळ्या स्पर्धा व प्रवेश परीक्षांसाठी संजीवनी फार्मसी महाविद्यालयामध्ये सातत्याने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येते. यामुळे संजीवनीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीत समाविष्ट असतात, असे श्री कोल्हे यांनी शेवटी सांगीतले. देश पातळीवर या यशा बध्दल आणि ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी सुमारे रू ३ लाखांची मदत मिळणार असल्याने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव कोल्हे, कार्याध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे, प्राचार्य डाॅ. किशोर साळुंखे, मार्गदर्शक डाॅ. प्रसाद गोर्डे व प्रा. अभिषेक राय यांचे अभिनंदन केले.