कोल्हे समर्थांकडुन माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवशी मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
Kolhe Samarth organizes various social activities in the constituency on the birthday of former minister Shankarrao Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 24March 2021, 19 :30
कोपरगाव : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचा वाढदिवस कोल्हे समर्थांकडुन मतदार संघात विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनातुन करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलच्या वतीने जिल्हा रूग्णालय येथे पाठपुरावा करून मतदार संघातील दिव्यांग बांधवांना ऑनलाइन उपलब्ध झालेल्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्तात्रय काले यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग सेलचे उपाध्यक्ष संदीप शहाणे, सचिव जयवंत मरसाळे, अल्पसंख्याक सेलचे खलीफ कुरेशी, फकिरमंहमद पहिलवान यावेळी उपस्थित होते.
पोहेगाव व चांदेकसारे येथे वृक्षारोपण व्हा. चेअरमन आप्पासाहेब दवंगे, बापुसाहेब औताडे, चंद्रकांत औताडे, बापुसाहेब औताडे, राजेंद्र औताडे, निखिल औताडे, औताडे, केशवराव होन, आप्पासाहेब होन, धीरज बोरावके, आदीसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला , करंजी येथे उपसरपंच रविंद्र आगवन यांचे हस्ते दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप तर संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोकमठाण येथील गोशाळेत चारावाटप करण्यात आले. यावेळी युवासेवक मोठया संख्येने हजर होते.
संवत्सर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश परजणे यांचे हस्ते दशरथवाडी येथील जिल्हा परिपद शाळेतील विद्यार्थ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केले. जेऊर पाटोदा येथील ज्ञानेश्वर महाराज मंदिरात बसलेल्या पारायणार्थीना सॅनिटाईझर व मास्क चे वाटप करण्यात आले यावेळी माजी सभापती मच्छिंद्र केकान, सरपंच मनीषा केकान, सतीश केकान, ताराबाई गरुड आदी उपस्थित होते.