श्रेयाच्या धास्तीपोटी बंदिस्त नाट्यगृहाचा दोन कोटी निधी आमदाराने अन्यत्र पळविला – सौ स्नेहलता कोल्हे

श्रेयाच्या धास्तीपोटी बंदिस्त नाट्यगृहाचा दोन कोटी निधी आमदाराने अन्यत्र पळविला – सौ स्नेहलता कोल्हे

MLA snatches Rs 2 crore from closed theater due to fear of credit – Mrs. Snehalta Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 25March 2021, 19 :30

कोपरगाव: शहरातील नाट्य रसिकांसाठी राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री तथा मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचेकडे पाठपुरावा करून आधुनिक बंदिस्त नाटयगृहासाठी दोन कोटीचा निधी व येवला नाका येथे पाटबंधारे विभागाची एक एकर जागा मिळवली होती. परंतु केवळ श्रेयाच्या धास्तीपोटी बंदिस्त नाट्यगृहाचा दोन कोटी निधी आमदाराने अन्यत्र पळविला, असल्याचा गंभीर आरोप भाजपा प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला,तर कोपरगावच्या नाटयरसिकांना नाटयगृहापासून वंचित ठेवण्याचे हे काम आमदार व नगराध्यक्ष यांनी संगनमतानेच केले असेही त्या म्हणाल्या,

सौ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, अहमदनगर जिल्हयातील मोठी नगरपरिषद असलेल्या कोपरगाव शहरातील कलात्मक व सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी आधुनिक नाटयगृह उभारणीच्या दृष्टीने सुमारे ८ कोटी रूपयाचा निधी मिळावा म्हणून दि. २० मार्च २०१५ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांचेकडे मागणी केली होती, त्यानुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक नपावै-2017/प्र.क्र.172/98/नवि-16. दि.20 नोहेंबर 2017 अन्वये सन 2017-18 करीता २ कोटी रूपयाचा निधी कोपरगाव नगरपरिषदेला वितरीत करण्यात आला. तसेच इरिगेशन बंगल्याजवळील पाटबंधारे विभागाची जागाही या नाटयगृहासाठी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार कोपरगाव शहरात आधुनिक नाटयगृहास जलसंपदा विभागाच्या मालकीची स.नं.1935 व 1939 मधील जागेपैकी एक एकर जागा महामंडळाच्या नियामक मंडळाच्या विपय क्र.65/2,ठराव क्र.65/18 अन्वये नाटयगृह बांधण्याकरीता हस्तांतरीत करणे व करारनामा करून घेणेबाबत उपविभागीय अभियंता, गोदावरी डावा तट कालवा, उपविभाग, कोपरगाव यांनी कोपरगाव नगरपरिषदेस कळविले होते. जागेचा ताबा घेऊन नाटयगृहाचे काम सुरू करण्याऐवजी विदयमान लोकप्रतिनिधी,नगराध्यक्ष आणि मुख्याधिकांरी यांनी संगनमत सदरचा निधी अन्यत्र वळवून बिले काढण्यासाठीचाच विरोधकांनी हा खटाटोप केला असून राजकीय द्वेषापोटी श्रेय मिळू नये म्हणून हे काम प्रलंबित ठेवून कोपरगावच्या नाटयरसिकांचा भ्रमनिरास केला असल्याची खंतही सौ कोल्हे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page