होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, नगर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास मनाई, नगर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Prohibition to celebrate Holi, Dhulivandan, Rangpanchami, orders of Nagar Collector

 २८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत प्रतिबंध

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 25March 2021, 20 :00

कोपरगाव: कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच आता दिवसागणिक रुग्णांची संख्याही मोठी आहे. कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव पसरण्याची भीती लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील होळी सणावर बंदी घालण्यात आलीय.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी नगर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रामध्ये साजरे होणारे होळी आणि धुलीवंदन सण उत्सव एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई आहे. तसेच हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक आणि खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे होळी, धुलीवंदन, रंगपंचमी साजरे करण्यास बंदी घालण्यात आलीय. हा आदेशानुसार २८ मार्च ते २ एप्रिल पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे. कारण २८ मार्च २०२१ ला साजरी होणारी होळी आणि २९ मार्चला साजरा होणारा धुलीवंदन आणि रंगपंचमी सण/उत्सव साजरे करण्यास मनाई केलीय. सदर मनाई आदेशांचं पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असंही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणालेत. तसेच जे कोणी आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर साथरोग अधिनियम १८९७ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.

Leave a Reply

You cannot copy content of this page