कोल्हे कारखाना आत्मनिर्भर भारत संकल्पनेत देशातील पहिल्या दहा कारखान्यांमध्ये सर्वोच्च स्थानी राहील – बिपीनदादा कोल्हे

कोल्हे कारखाना आत्मनिर्भर भारत संकल्पनेत देशातील पहिल्या दहा कारखान्यांमध्ये सर्वोच्च स्थानी राहील – बिपीनदादा कोल्हे

तर उस रस इथेनॉल निर्मीतीत सहकारात पहिला So that juice was the first in cooperation in ethanol production

The Kolhe factory will be among the top ten factories in the country in terms of self-reliant India – Bipindada Kolhe

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 27March 2021, 18 :30

कोपरगांव : माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे समर्थ मार्गदर्शनाखाली पॅरासिटामॉल औषधनिर्माण शास्त्र फार्मा डिव्हिजन, अद्यावत संशोधन प्रयोगशाळेची निर्मीती केली असुन सहा वर्षात कोल्हे कारखाना आत्मनिर्भर भारत संकल्पनेत देशातील सहकारी तत्वावरील पहिल्या दहा कारखान्यांमध्ये सर्वोच्च स्थानी राहिल असा विश्वास संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शनिवारी २७ रोजी कारखान्याच्या ५८ व्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यक्त केला. तर उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मितीत राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असल्याचा पुर्नउच्चारही कोल्हे यांनी केला.

यावेळी, जिल्हा बँक संचालक विवेक कोल्हे सत्कार केला.२२०० सभासद ऑनलाईन जोडले गेले होते. प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सुर्यवंशी यांनी स्वागत केले. अहवाल विषय पत्रिकेवरील सर्व चौदा विषयांना सभासदांनी रितसर सुचना व अनुमोदन देवुन टाळयांच्या गजरात त्यास मंजुरी दिली. मागील सभेचे अहवाल वाचन सचिव तुळशीराम कानवडे यांनी केले. अहवालसालात दिवंगत झालेल्या सभासद हितचिंतकांना उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी श्रध्दांजली वाहिली. अहवाल सालात सदाशिव माधव बोठे (आडसाली-करंजी), वाळीबा रघुनाथ सांगळे (पुर्वहंगामी सत्यगांव), सौ मंगल रमेश गांगुर्डे (सुरू-तळेगांवमळे), व सौ कुसुमबाई साहेबराव जाधव (खोडवा-तळेगांवमळे) या सर्वाधिक उस उत्पादन घेणां-या सभासदांचा उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व त्यांच्या संचालक सहका-यांनी थेट घरी जाउन सत्कार केला. बिपीनदादा कोल्हे म्हणाले, कोल्हे कारखान्यांला संघर्ष नविन नाही.विवेक कोल्हेंच्या कार्यकुशलतेतुन प्रतिदिन साडेचार ते पाच हजार मे. टनापर्यंत गाळप वाढवून आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसशी पावणेसहा हजार मे टन उसाचे नेत्रदिपक गाळप केले. एप्रिलच्या तिस-या आठवडयात ८ लाख मे टन उसाचे गाळप पुर्ण करेल. धरणांत पाणी असुनही लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कालवा सल्लागार समितीत ठरलेली रब्बी उन्हाळ पाण्यांची आर्वतने गोदावरी कालव्यांना मिळाली नाही, विहीरीत पाणी वीज तोडल्यामुळे शेतक-यांना पिकांना वेळेवर पाणी देता आले नाही पाटपाणी नियोजनाचे तीनतेरा वाजले याला जबाबदार कोण. शेतकरी हितासाठी आघाडी करता मग तोंडातला घास हिरावला जात असतांना दुटप्पी भूमिका का घेता असा सवाल बिपीनदादा कोल्हे यांनी शेवटी केला. उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले. चौकट- स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आदींनी रोवलेल्या सहकारासमोर खाजगीचे मोठे आव्हान उभे आहे सहकार मोडकळीस येईल तेंव्हा राजकीय जोडे बाजुला ठेवुन सर्वांनी आत्मचिंतन करून या उद्योगाला वाचविण्यांसाठी पुढे यावे असे आवाहन बिपीनदादा कोल्हे यांनी केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page