वकीलास मारहाण केल्याप्रकरणी आठजणांविरोधात गुन्हा दाखल

वकीलास मारहाण केल्याप्रकरणी आठजणांविरोधात गुन्हा दाखल

Charges filed against eight persons for assaulting a lawyer

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 28March 2021, 20 :00

कोपरगाव : क्रिकेटच्या सामन्यात खेळाडू आऊट झाल्याच्या कारणावरून आरोपी मजकूर यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना मारहाण शिवीगाळ दमदाटी केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात आठजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, यातील तक्रारदार पेशाने वकील आहेत.

संजय सुभाष जाधव,अभिजीत दीपक जाधव,माजहरी सुभाष जाधव, भूषण दीपक जाधव,नामदेव शिंदे, संदीप सुरेश जाधव,विठ्ठल बाळासाहेब जाधव, जय संजय जाधव सर्व राहणार वारी तालुका कोपरगाव यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अतुल विनायकराव लोंढे (३८) वकिली रा. बाबुळगाव खुर्द तालुका येवला जिल्हा नाशिक, यांनी पोलिस तालुका ठाण्यात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना रविवारी २८ मार्च रोजी दुपारी २ वाजता सोमया कारखाना मैदान वारी कोपरगाव येथे घडली आहे. क्रिकेटच्या सामन्यात खेळाडू आऊट झाल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तक्रारदार व साक्षीदारांना आरोपित यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून बॅट स्टॅम्पनी हातावर करंगळीवर मारहाण करून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली . या सर्व घटनेनंतर तक्रारदार वकील यांनी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीतांविरुध्द गुन्हा दाखल केला. तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. आर. एम. म्हस्के तपास करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page