कोपरगाव येथे पोलिसांच्या धाडीत १०७ किलो गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

कोपरगाव येथे पोलिसांच्या धाडीत १०७ किलो गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा

107 kg beef seized in police raid at Kopargaon; Crime against both

याप्रकरणी दोघांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 30March 2021, 17:30 :00

कोपरगाव : कोपरगाव शहरातील वार्ड क्रमांक ४ मधील आएशा काँलनी कोपरगाव येथे सार्वजनीक वाचनालयासमोर घराचे कंपौंडमध्ये अवैधरित्या चालू असलेल्या कत्तलखान्यात पोलिसांनी मंगळवारी (ता. ३०) रोजी दुपारी १२.१५ वाजता धाड टाकून १०७ किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे .

येथील कथित कत्तलखान्यात अवैधरित्या विनापरवानगी गोवंशाची हत्या करुन गोमांस विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना होती. मंगळवारी (३०) रोजी दुपारी सापळा रचून संबंधित ठिकाणावर धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरुन दहा हजार ७०० रुपये किमतीचे गोमांस २०० रु किंमतीचे दोन लोखँडी कोयते एक बाजुने धारदार जु वा १०० रु किंमतीचे तारजु काटा,५०० रु किंमतीचे वजनमापे त्यात ५ किलो २.किलो व १ किलो मापे असा एकूण ११५०० रु किमतीचा माल जप्त करुन दोघांना ताब्यात घेण्यात आले. अचानक झालेल्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. शहर पोलिसांनी आरोपी अन्सार गफार कुरेशी (३०)व अतिक मुजीब कुरेशी वय (१९) वर्ष दोन्ही रा. आएशा काँलनी कोपरगाव यांना अवैधरित्या व विनापरवानगी गोवंशाची कत्तल करुन गोमांस विकण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेऊन कार्यवाही केली. याप्रकरणी पोकॉ/ १५८५ सचिन रामनाथ शेवाळे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोनी वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका १७७७ डी. आर. तिकोणे हे करीत आहेत.

Leave a Reply

You cannot copy content of this page