नपाची कोपरगाव शहरात प्लॅस्टीक, विक्रेत्यांवर मोठी कारवाई

नपाची कोपरगाव शहरात प्लॅस्टीक, विक्रेत्यांवर मोठी कारवाई

Big action against plastic sellers in Kopargaon city of Nagarpalika

शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी त्याची विक्री केली, साठवणूक केल्याचे दिसून आले.Many merchants in the city sold it, appeared to have stockpiled it.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 30March 2021, 20:30 :00

कोपरगाव : कोपरगाव शहरात आज नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्लास्टिक विक्रेत्यांवर मोठी कारवाई करण्यात आली. थर्माकोल, प्लास्टीकला बंदी असताना विक्री प्रकरणी व्यापाऱ्यांवर नगरपालिकेने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४० किलो , प्लास्टीक जप्त केले आहे.

कोपरगाव शहरात प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालून दिलेली असताना देखील शहरात एका ठिकाणी सिंगल युज प्लास्टिकचा मोठा साठा असल्याचे नगरपालिका प्रशासनास कळताच त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सुमारे अंदाजे ४० किलो सिंगल युज प्लास्टिक जप्त संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप-मुख्याधिकारी सुनील गोर्डे, आरोग्य विभागाचे प्रमुख सुनील अरण,मनोज लोट,रणधीर तांबे,चंद्रकांत साठे यांनी ही कारवाई केली. ३० मार्च रोजी व्यापारी धर्मशाळा या ठिकाणी ही तपासणी मोहीम पालिकेने राबविली होती.
राज्यात प्लास्टीक व थर्माकोल अविघटनशिल वस्तूच्यां वापरावर, उत्पादनावर, विक्री, हाताळणी, साठवणूकीवर बंदी असताना शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी त्याची विक्री केली, साठवणूक केल्याचे दिसून आले. यामुळे शहरातील ५ ते ६ व्यापा-यांकडून दोन-तीन वेळेस ते प्लास्टीक ३६० किलो जप्त करून दंडात्मक कारवाई करून ते चाळीस हजार रुपयांचा दंड वसूल केला सदरची प्लास्टिक औद्योगिक वसाहतीतील एका उद्योजकाला करार करून विकण्यात आल्याची माहिती आरणे यांनी दिली.

प्लॅस्टीक पिशवी विक्री सरार्स सुरू

प्लॅस्टीक विक्री बंदी असतांना प्लॅस्टीक पिशव्या विक्री सरार्स सुरू आहे. तसेच होलेस विक्रेते अन्य विक्रेत्यांना बंदी असलेल्या प्लॅस्टीक पिशव्या विकत असल्याने कोपरगाव शहरात पून्हा कचऱ्याची समस्या वाढू लागली आहे.
कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने प्लास्टिक बंदीची मोहीम वेळोवेळी राबण्याचा प्रयत्न केला परंतु काही नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे हि मोहीम थंडावली होती. कशी घाट गाडीवर अनेकदा प्लॅस्टिक मिळून येते परंतु किमान पाच हजाराचा दंड करायचा म्हटले तर त्या गाडीवर हात गाडीवर संपूर्ण मालाची किंमत ही तेवढी नसते त्यामुळे आमचा कारवाई करताना नाईलाज होतो परंतु आता आता यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही तेव्हा हात गाडी वाल्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी अन्यथा त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई होईल.
अशाच प्रकारची कारवाई शहरात दररोज वेगवेगळ्या भागात राबविण्यात येणार असल्याचे या मोहिमेचे व आरोग्य विभागाचे प्रमुख आरणे यांनी सांगितले.

Leave a Reply

You cannot copy content of this page