ज्योती पतसंस्थेचा साडेतीनशे कोटीच्या पुढे एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार – अँड रविकाका बोरावके

ज्योती पतसंस्थेचा साडेतीनशे कोटीच्या पुढे एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार – अँड रविकाका बोरावके

Jyoti Patsanstha crosses Rs.350 crores-Ad. Ravikaka Boravake

२२२ कोटीच्या ठेवी, २.४० कोटीचा नफा Deposits of Rs 222 crore, profit of Rs 2.40 crore

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 6April 2021, 15:40 :00

कोपरगाव : संस्थेमध्ये ग्राहकांना दिला जाणारा आदर, आपुलकीची सेवा आणि खूप मोठी विश्वासार्हता या जोरावर संस्थेने नुकताच ३६४ कोटींच्या एकत्रित व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. नुकत्याच झालेल्या २०२०-२१ या आर्थिक वर्षात संस्थेला २ कोटी ४० लाख नफा झाला आहे तर १४२ कोटी रुपयांची कर्ज वाटप करण्यात आली आहे संस्थेची गुंतवणूक ९६ कोटी रुपये इतकी आहे.कोविड काळात संस्थेने आपले कामकाज अखंडपणे चालू ठेवत ग्राहकांना खातेदारांना नियोजनबद्ध नम्र व जलद सेवा दिली,अशी माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन अँड रविकाका बोरावके यांनी दिली आहे.

बोरावके म्हणाले, सभासद व ठेवीदारांनी उत्तम प्रतिसाद दिल्याने संस्थेच्या भागभांडवल व व्यवसायात समाधानकारक वाढ झाली आहे.सातत्याने ऑडीट वर्ग अ सांभाळताना सगळ्याच संस्थाना तारेवरची कसरत करावी लागते पण संस्थेची गुणवत्ता व दर्जा उंचावण्यात व राखण्यात संस्थेची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. सातत्य राखण्यासाठी आवश्यक प्रमाणके संस्थेने पूर्ण करून सन २०१९-२० या मागील आर्थिक वर्षासाठी शासकीय लेखापरीक्षणात अ वर्ग मिळवला आहे. याही २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना देखील संस्थेने आवश्यक ती प्रमाणके पूर्ण करून ठेवी कर्ज भागभांडवल व गुंतवणूक या सर्व यामध्ये वाढ करून मागील वर्षाच्या तुलनेत एनपीए चे प्रमाण कमी करण्यात संस्थेस यश आले आहे. सामान्य नागरिक व इतर संस्थांसाठी ठेवीच्या व कर्जाकरीता कमीत कमी व्याज दराने कर्ज वितरित केले आहे. त्यास खातेदारांनी उत्तम रित्या प्रतिसाद दिला. येणाऱ्या  वर्षात छोट्या मोठ्या व्यवसाय सुरु करणाऱ्या ग्राहकांना त्यावेळी पतपुरवठा करून ग्राहकांच्या व्यवसायामध्ये सर्वात महत्त्वाची भांडवल उपलब्धतेची भूमिका संस्था बजावणार आहे . आज त्या ग्राहकांच्या यशाचा आलेख आणि संस्थेप्रती त्या ग्राहकांची निष्ठा दोन्ही अचंबित करणारी आणि अतिशय समाधान देणारी आहे. कर्ज वसुलीसाठी काही कर्जदाराबरोबर कठोर निर्णय घ्यावे लागले. मात्र त्यामुळे कर्ज वसुली चांगली झाली. ग्राहक हिताशी कधीही तडजोड न करणारी संस्था म्हणून संस्थेचे नाव समाजमनात उमटले आहे. यापुढेही यात सातत्य राखले जाईल असे अॅड. बोरावके यांनी सांगितले.

छोटे मोठे व्यवसाय उभे करण्यासाठी पाठबळ देण्याबरोबरच इतरही सामाजिक कार्यात संस्था नेहेमीच अग्रेसर राहिली आहे. मागील आर्थिक वर्षात कोरोना संकटात सभासद ठेवीदार कर्जदार व हितचिंतकांसाठी सुमारे ३० ते ३५ हजार आर्सेनिक अल्बम ३० रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याच्या गोळ्यांचे वाटप तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने केले आहे. तसेच संस्थेने नेहमीच सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतलेला आहे संस्थेच्या प्रगतीत सभासद, ठेवीदार, खातेदार व ज्योती मंगल ठेव प्रतिनिधी, संस्थेचे सर्व संचालक, शाखा अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान आहे असे संस्थेचे चेअरमन अॅड.रविकाका बोरावके शेवटी म्हणाले,

Leave a Reply

You cannot copy content of this page