कोपरगाव तहसिलदार योगेश चंद्रे  यांना पितृशोक

कोपरगाव तहसिलदार योगेश चंद्रे  यांना पितृशोक

Kopargaon Tehsildar Yogesh Chandre – His father passed away

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 6April 2021, 14:40 :00

कोपरगाव : सिन्नर  तालुक्यातील कोळगाव माळ येथील प्रगतशील शेतकरी विठ्ठलराव गंगाधर पाटील चंद्रे  यांचे निधन झाले आहे.मृत्यू समयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्यावर कोळगाव माळ येथील अमरधाम स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.

स्व.विठ्ठलराव चंद्रे यांच्या पश्‍चात बंधू, पत्नी, दोन मुले,दोन मुली, पुतणे, सुना,जावई, नातवंडे असा चंद्रे परिवार आहे.
कोळगावमाळचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते किरण चंद्रे व कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचे ते वडील होते.तर त्यांच्या पत्नी मुक्ताबाई चंद्रे या कोळगाव माळ ग्रामपंचायतीच्या सरपंच आहे. विठ्ठलराव चंद्रे यांचा स्पष्ट,सुस्वभावी आणि मनमिळावू स्वभाव राहिला.पंचक्रोषित ते “अप्पा” या नावाने ओळखले जात.

Leave a Reply

You cannot copy content of this page