१३ एप्रिलला एकाचवेळी दोन्ही उन्हाळी आवर्तने सुटणार-  आ. आशुतोष काळे     

१३ एप्रिलला एकाचवेळी दोन्ही उन्हाळी आवर्तने सुटणार-  आ. आशुतोष काळे

जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरद्वारे संवाद साधना आ. आशुतोष काळे.

Both the summer Arvatan will be released simultaneously on 13th April. Ashutosh Kale

डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला १३.५ कोटी मंजूर 13.5 crore sanctioned for repair of left canal

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 6April 2021, 19:15 :00

कोपरगाव :यापूर्वी  कालवा सल्लागार समितीत ठरलेली दोन्ही उन्हाळी आर्वतने १३ एप्रिलपासून एकाचवेळी सोडण्याचा निर्णय जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत घेतला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.तसेच ना. पाटलांनी शंभरी पार कालवा दुरूस्तीसाठी १३ कोटीचा पहिला टप्पा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले आहे .

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व बाजूस कोणत्याही प्रकारचे बंधारे न बांधणेचा आदेश शिथिल करून तालुक्यात बंधारे बांधण्यास परवानगी मिळणेबाबत विचारविनिमयासाठी व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आ. आशुतोष काळे यांच्या मागणीतूनच १३ एप्रिलपासून डाव्या व उजव्या कालव्याला एकाचवेळी दोन्ही उन्हाळी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे १५ जूनपर्यंत डावा व उजवा कालवा वाहणार असून त्याचा फायदा लाभक्षेत्रातील शेती सिंचनाबरोबरच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

या बैठकीत आ. काळे यांनी मंजूर बंधाऱ्याच्या विषयाला हात घालून मंजूर बंधाऱ्याचे काम पूर्ण क्षमतेने सुरु करण्याबाबत आग्रह धरला तसेच मतदार संघामध्ये बंधारा कम पूल बांधण्याची मागणी केली. यामध्ये वडगाव कानळद, मंजूर, माहेगाव देशमुख, हिंगणी, डाऊच खुर्द, सडे, शिंगवे व पुणतांबा याठिकाणी बंधारा कम पूल बांधल्यास पावसाळ्यात पाणी साठविले जाऊन त्या पाण्याचा उन्हाळ्यात सिंचनासाठी उपयोग होऊ शकतो व त्याचबरोबर पूल बांधल्यास दळणवळणाचा मोठा प्रश्न देखील मार्गी लागून त्याचा मोठा फायदा नागरिकांना होणार असल्याचे आ. काळे यांनी यावेळी सांगितले.                

शंभरी पार केलेल्या गोदावरी कालव्यांचे मजबुतीकरणासाठी ६०० कोटी रुपये निधी मिळावा अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केलेली आहे. त्यापैकी ७८ कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी दाखल करण्यात आलेले आहेत. त्या प्रस्तावांपैकी या बैठकीत डाव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यातील १३ कोटी ०५ लाख ८६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. व पुढील निधी देखील तातडीने उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही मंत्री ना. पाटील यांनी दिली असेही त्यांनी सांगितले आहे.          

   चौकट :- गोदावरी कालव्यांचा पाणी प्रश्नांची लढाई  आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत  लढणा-या कर्मवीर शंकरराव काळे यांना १०० व्या जयंतीनिमित्त ना. जयंत पाटीलांनी   १३.५ कोटी  निधीची मंजूरी हिच  त्यांना  खरीखुरी सुमनांजली असून हे आ. आशुतोषचे यश आहे. कारण ही लढाई लढण्याचे भाग्य त्याला मिळाले आहे – मा.आ. अशोक काळे   

Leave a Reply

You cannot copy content of this page