कोपरगाव तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री; १७ हजाराची देशी-विदेशी दारू जप्त
Sale of illegal liquor in Kopargaon taluka; 17,000 domestic and foreign liquor confiscated
कोपरगाव शहर पोलिसांची धडक कारवाई Kopargaon city police crackdown
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 7April 2021, 14:15 :00
कोपरगाव : कोपरगाव शहर पोलिस हद्दीतील जेऊर कुंभारी व कोकमठाण शिवारात तीन वेगवेगळ्या ठिकाणी घराच्या व हॉटेलच्या आडोशाने चक्क बेकायदेशीररित्या देशी-विदेशी दारू विक्री होत असल्याची घटना मंगळवारी (ता.०६) संध्याकाळी सात ते पावणे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. विजय जगन्नाथ भाबड (४२) जेऊर कुंभारी, योगेश आत्माराम जगताप (३५ ) पुणतांबा फाटा, व ललित नंदू घोडे (३२) हॉटेल रानवारा च्या आडोशाला असे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. त्याच्याकडून १७ हजार ३३४ रुपये किमतीची भिंगरी, संत्रा, मॅकडॉल नंबर १ देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात काही ठिकाणी अवैधरित्या दारू-विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले
यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी मंगळवारी (ता.६ ) रोजी सायंकाळी सात ते पावणे आठ वाजेच्या सुमारास कारवाई केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल २४८४ प्रकाश सुरेश नवाळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिरा साडेदहा वाजता वरील तीन जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शैलेंद्र ससाने व पोलीस नाईक ८५६ ए. एम. दारकुंडे हे करीत आहेत.