नगरपरिषदेने फंडातून एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करा- नगरसेवकांची मागणी
The Municipal Council has provided Rs. Buy City Scanning Machine Quickly- Demand from Corporators
कोपरगांव : कोपरगाव मध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असुन कोपरगाव मध्ये एकच एच.आर.सीटी केंद्र आहेत कोपरगांवची कोरोनाची परिस्थिती पाहता पालिकेने फंडातुन एच.आर.सी.टी. स्कॕनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी गटनेते रविंद्र पाठक, शिवसेनेचे गटनेते योगेश बागुल व उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, नगरसेवक जनार्दन कदम, आरीफ कुरेशी, शिवाजी खांडेकर यांनी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.
दिलेल्या लेखी निवेदनात उल्लेख केला आहे की, आपल्या देशामध्ये वाढत असलेल्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करुन लढा देत आहे मात्र पुरेशा साधन सामृग्री अभावी रुग्णांना सेवा देण्यात फार मोठया प्रमाणात अडथळे येत आहेत त्यामुळे कोपरगांव शहर व ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत असुन ही रुग्ण वाढ रोखण्याकरिता मोठया प्रमाणात उपाय योजना करणे गरजेचे आहे.
कोपरगांव शहरात एकच एच.आर.सीटी स्कॅन मशीन असल्याने तालुक्यातील विविध गावातुन नागरिक तपासणीसाठी येत असतात यासाठी बराच वेळ जातो त्यामुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना फार मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्याकरिता मानवतेचा दृष्टीकोन समोर ठेवुन आपण कोपरगांव नगरपरिषदेच्या नगरपालिका फंडातुन तातडीने एच.आर.सीटी स्कॅन मशीन खरेदी करण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा घेवुन त्यामध्ये सदरचा ठराव आम्ही सर्वानुमते मंजुर करुन देण्यास तयार आहोत. यामुळे गोर गरिब जनतेला दिलासा मिळुन त्यांना लवकरात लवकर उपचार घेणे सोयीस्कर होवुन त्यांची खाजगी उपचार घेतांना त्यांची आर्थिक पिळवणूक थांबेल या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशसचिव माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी देखील शहराकरिता एच.आर.सीटी स्कॅन मशीन शहराकरीता उपलब्ध करुन देणे बाबतची मागणी मंत्री ग्रामविकास तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्याकडे देखील लेखीपत्राव्दारे समक्ष मागणी केलेली आहे. आपण याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करुन कोपरगांवच्या जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती देखील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेचे नगरसेवकांनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे यांच्याकडे केली आहे.