सोना पॉली प्लास्टकडुन रॅपिड टेस्ट किट साठी ५१हजार

सोना पॉली प्लास्टकडुन रॅपिड टेस्ट किट साठी ५१ हजार

51,000 for Rapid Test Kit from Thole’s Sona Poly Plast

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3May 2021, 16:20 :00

कोपरगाव : कोपरगाव करांवर ज्या ज्या वेळी मोठी आपत्ती संकटे येतात त्या त्या वेळी कोणतीही प्रसिद्धी न करता सढळ हाताने येथील ठोळे उद्योग समूह व सोना पाँली प्लास्ट प्रायव्हेट लिमिटेड च्या वतीने मोठी आर्थिक मदत करीत असतात आज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रॅपिड टेस्ट किट साठी उद्योग समूहाचे संचालक व उद्योजक कैलास चंद्र ठोळे व राजेश ठोळे यांनी ५१ हजार रुपये मदतीचा धनादेश तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे सुपूर्त केला.

गतवर्षीही ज्यावेळी कोरोना आला होता त्यावेळीही ग्रामीण रुग्णालयाला ५१ हजार रुपयांची टेस्टिंग मशीन किट पी. पी. ई. कीट औषध गोळ्या आदी वस्तू डॉ. फुलसौंदर यांच्याकडे सुपूर्त केले होते .ठोळे उद्योग समूहाची नेहमीच आर्थिक मदत नेहमीच केली जाते त्यांनी मागील वर्षी एम एस जी एम महाविद्यालयात सुरू केलेल्या कोरोना सेंटरमध्ये दोनशे ते अडीचशे रुग्णांना दररोज तीन महिने जेवन पुरवले होते. तसेच लॉक डाउन काळात राज्यातील परराज्यातील नागरिक पायी परतत असलेल्यांना त्यांना ठोळे उद्योग समूह तसेच अरविंद भन्साळी, कांतीलाल अग्रवाल रवींद्र ठोळे, वाल्मीक कातकडे आदींच्या सहकार्याने हजारो नागरिकांना जेवण नाष्टा पाणी देण्याची सोयही आठवडाभर केली होती. महापुराचे संकट ज्यावेळी आले होते त्यावेळी पूरग्रस्तांना किट चे वाटप त्यांनी केले होते . यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे आदी उपस्थित होते.

चौकट

स्वर्गीय भागचंद भाऊ ठोळे हे कैलास शेठ ठोळे यांचे वडील होते, ते ही नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून जात त्यांनी उभा केलेला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आजही कार्यरत आहे. त्या माध्यमातूनही विविध गरजूंना मदत करण्यात येते वडिलांची परंपरा आम्ही ठोळे कुटुंबीयांनी आजही कोणतीही प्रसिद्धी न करता सुरू ठेवली आहे. जगभरात कोरोना ने थैमान घातले आहे भारतावरील कोरोनाचे हे संकट साईबाबांनी लवकरात लवकर परतून लावावे अशी मनोमन इच्छा व्यक्त करून भारत देश यातुन मुक्त व्हावा म्हणून त्यांनी प्रार्थना केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page