कोपरगावात १०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटर सुरू 

कोपरगावात १०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटर सुरू

Karmaveer Shankarrao Kale Kovid Center of 100 Oxygen Beds started in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3May 2021, 16:40 :00

१०० ऑक्सिजन बेड कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटरच्या शुभारंभप्रसंगी

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदार संघात बाधित रुग्णांना आपला जीव वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेडची नितांत गरज भासत होती ही अडचण ओळखून १०० ऑक्सिजन बेडचे कर्मवीर शंकरराव काळे कोविड सेंटर कार्यान्वित झाले असून आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते अतिशय साध्या पद्धतीने लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे.

आ. आशुतोष काळे यांनी १०० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू करून ऑक्सिजन बेडची आवश्यकता असणाऱ्या बाधित रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. तीन हजार टेस्टिंग किट आरोग्य विभागाला दिल्या आहेत. ऑक्सिजन अंबुलन्स दिली, माझे कुटुंब, माझी जबाबदारी ही मोहीम त्यामुळे कोरोनाचे संकट जरी गंभीर असले तरी आमदार आशुतोष काळे खंबीर असल्याचे त्यांनी केलेल्या उपाय योजनांतून दिसून येते . सौ. पूर्णिमा जगधने अर्जुनराव काळे, सुधाकर रोहोम  कारभारी आगवन, गोरक्षनाथ जामदार, धरमशेठ बागरेचा, मंगेश पाटील, वीरेन बोरावके, मंदार पहाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. दीपक पगारे, एसएसजीएमचे प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे आदी मान्यवर उपस्थित होते.

चौकट –

कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे मनाला अतिशय वेदना होत होत्या. सर्वत्रच परिस्थिती अत्यन्त अवघड होती. त्यामुळे १०० ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण रुग्णालयात आयसीयूसह ३० व या डेडिकेटेड कोविड सेंटरचे १०० असे एकूण १३० बेड गंभीर कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध करून देऊ शकलो याचे मोठे समाधान मिळाले आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे ऑक्सिजनची अडचण भासणार नाही. नियमित वापरात येणाऱ्या तीस ऑक्सिजन सिलेंडची क्षमता असलेले आठ लाख रुपयांचे दोन ड्युरा सिलेंडर खरेदी केले आहे. ५५९बेडचे कोविड केअर सेंटर, १०० बेडचे कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटर व बायपॅप मशीन आदी सुविधा असलेले डेडीकेटेड (आयसीयू)कोविड केअर सेंटर अशा त्रिसूत्रीच्या सहाय्याने बाधित रुग्ण लवकरात लवकर बरे होणार असून अजूनही अवघड परिस्थिती निर्माण झाली तर आणखी बेडची व्यवस्था करण्यास मागे पुढे पाहणार नाही – आ. आशुतोष काळे 

Leave a Reply

You cannot copy content of this page