कोपरगावात लसीकरणासाठी उडाली झुंबड

कोपरगावात लसीकरणासाठी उडाली झुंबड

In Kopargaon, there is a rush for vaccination

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 6May 2021, 17:20 :00

कोपरगाव : १८ ते ४५ वयोगटातील लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी गुरूवारी (६) रोजी सकाळी ६ वाजेपासून कोपरगाव नगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर रांगा लागल्या होत्या. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पुन्हा लसीकरण केंद्रांवर झुंबड उडाली आहे. लसीकरणात सुसूत्रता नसल्याने केंद्रांवर व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. ही लसीकरण केंद्र गर्दीमुळे कोरोना प्रसार केंद्र ठरण्याची शक्यता आहे.

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी कोपरगाव नगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांबाहेर लस घेण्यासाठी गुरूवारी (६) रोजी सकाळपासून नागरिकांची गर्दी होत होती . ज्येष्ठांचे गर्दीमुळे हाल होत आहेत. लसीकरणात सुसूत्रता येऊन नागरिकांची ससेहोलपट थांबणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरांनंतर आता ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. सुरवातीला लसीकरणाकडे दुर्लक्ष करणारे आता लस घेण्यासाठी आरोग्य केंद्रांबाहेर रांगा लावत आहेत. मात्र, लसीचा साठा मर्यादित असल्याने नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. लसीकरणासाठी नोंदणीचे वेळापत्रक नसल्याने नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्याला धक्काबुक्की केली असल्याचा आरोप करत काही नागरिकांनी या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर तणाव निवळला. लसीकरणासाठी होणारी गर्दी, गोंधळ टाळण्यासाठी अनेक ठिकाणी लस उपलब्ध झाल्यानंतर या नोंदणी केल्यानंतर संबंधितांना मोबाईलवरून कळविले जाते. त्यामुळे नागरिकांनी उगाच घाई करून स्वतःहाची ससेहोलपट करून घेऊ नये . येथील आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरणासाठी सध्याची टोकण पद्धत चांगली आहे; आज साधारण तीनशे लोकांना टोकन देण्यात आले होते, परंतु प्रत्यक्ष नोंदणी धारक केवळ शंभर जण होते त्यामुळे त्या शंभर जणांना लस देण्यात आल्याचे समजते. टोकण पद्धत चांगली असली तरी त्यासाठी लसींचे नियोजन व साठा वाढविण्याची गरज आहे.

चौकट

दरम्यान आज गुरूवारी (६) रोजी पहिल्या दिवशी केंद्रावरील आणि उडालेला फज्या पाहता स्थानिक नगरसेवक जनार्दन कदम यांनी शहरात वॉर्डनिहाय लसीकरण केंद्र स्थापन करण्याची मागणी निवेदनाद्वारे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर तसेच डॉ. वैशाली बडदे यांना समक्ष भेटून केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page