गटसचिवांना मिळणार वैद्यकीय विमा सुरक्षा कवच-विवेक कोल्हे
Group secretaries will get medical insurance cover – Vivek Kolhe
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 6May 2021, 10:20 :00
कोपरगांव : गट सचिव कोरोनासारख्या महामारीत त्यांच्या आरोग्याचा विचार करुन अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय ५३९ सचीव तर संस्था नियुक्त २१८ अशा एकुण ७५७ गट सचिवांना बँकेमार्फत वैद्कीय विमा सुरक्षा कवच मिळावे अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्याकडे गेल्या महिन्याभरापुर्वीच केली होती त्याच पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील सर्व गट सचिवांना वैद्यकीय विमा सुरक्षा कवच देण्याचा निर्णय जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने घेतला असल्याची माहीती जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी दिली आहे.
कोल्हे पुढे म्हणाले की, कर्जवसुलीचे काम शेतकरी व सभासदांपर्यंत प्रत्यक्ष जाऊन गट सचिवांना नेहमी करावे लागते. आपला जीव जोखमीत टाकून हे सर्व गट सचिव काम करतात.कर्मचारी हा कुठल्याही संस्थेचा अविभाज्य घटक असतो.संस्थेने कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांच्या आरोग्याकडे जाणीपुर्वक लक्ष देण्याची आज खरी गरज निर्माण झालेली असल्यामुळेच गटसचिवांना वैद्यकीय विमा सुरक्षा कवच संस्थेमार्फत देणे क्रमप्राप्त होते. तो निर्णय घेतल्याबद्दल अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाने घेतलेल्या या सकारात्मक निर्णयाबद्दल कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले आहे.